गुन्हे विषयक
आरोपींचा घरभरणीच्या कार्यक्रमात धुडगूस,कोपरगावात चार जणांविरुद्ध गुन्हा,दोन अटकेत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या ‘साईकुबेर सिटी’ या उपनगरात काल रात्री १० वाजेच्या सुमारास घरभरणीच्या पूर्व तयारीचा विधिवत कार्यक्रम सुरू असताना तेथे आरोपीं नकुल धर्मराज ठाकरे,शारदा नगर,संकेत मगर,मयूर गायकवाड,ऋषी पवार,तुषार सोनवणे आदी आरोपींनीं घटनास्थळी प्रवेश करून वाद्य वाजविण्याचे बंद केल्याचे कारणावरून मारहाण करून एक माहिलेसह दोन जण जखमी केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपी नकुल ठाकरे,तुषार सोनवणे यांचा पाठलाग करून जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.
घरभरणीच्या ठिकाणी आरोपी नकुल धर्मराज ठाकरे,शारदा नगर,संकेत मगर,मयूर गायकवाड,ऋषी पवार,तुषार सोनवणे सर्व रा.कोपरगाव हे आले व त्यांनी रात्रीचे वेळी त्यांनी अरेरावी करत आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सदर ठिकाणी जाऊन,”तुम्ही साउंड सिस्टीम बंद का केली ? असा जाबसाल केला व “साउंड सिस्टीम सुरू करा,आम्हाला नाचायचे आहे” असे बोलून आरोपी नकुल ठाकरे याने फिर्यादिस व त्याच्या नातेवाईक महिलेस तेथे स्वयंपाकीने स्वयंपाकासाठी आणलेल्या लोखंडी उलथन्याचा वापर करून मारहाण केली आहे व त्यानां जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी अभिजित दवंगे हा कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथील रहिवासी असून त्यांचा व्यवसाय आहे.त्यांच्या मावशीच्या घरी नगर-मनमाड रोडलगत घरभरणीचा कार्यक्रम असल्याने तो आपल्या नाइतेवाईकांसह तेथे हजर होता.सदर ठिकाणी दि.२० नोंव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास वाद्य वाजविण्याची वेळ संपल्याने आपले वाद्य वाजविण्याचे काम बंद करून कार्यक्रम आटोपला होता.अशा वेळी त्या घटनास्थळी आरोपी नकुल धर्मराज ठाकरे,शारदा नगर,संकेत मगर,मयूर गायकवाड,ऋषी पवार,तुषार सोनवणे सर्व रा.कोपरगाव हे आले व त्यांनी रात्रीचे वेळी त्यांनी अरेरावी करत आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सदर ठिकाणी जाऊन,”तुम्ही साउंड सिस्टीम बंद का केली ? असा जाबसाल केला व “साउंड सिस्टीम सुरू करा,आम्हाला नाचायचे आहे” असे म्हणाले व फिर्यादी व त्यांचे नातेवाईक समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन त्यांनी,”आम्ही कोण आहे तुम्हाला माहिती आहे का ? “आम्ही कोपरगावचे डॉन आहोत,आमच्या कुणी नादी लागत नाही” अशी बढाई मारून आरोपी नकुल ठाकरे याने फिर्यादिस तेथे स्वयंपाकीने स्वयंपाकासाठी आणलेल्या लोखंडी उलथन्याचा वापर करून मारहाण केली आहे व त्यानां जखमी केले आहे.या शिवाय सदर ठिकाणी असलेली पाहुणी महिला मनीषा डेंगळे रा.निमगाव जाळी या घटनेत जखमी झाल्या आहे.
यातील आरोपी नकुल ठाकरे हा सराईत गुन्हेगार असून यावर या आधी पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या गुन्ह्यांचे गांभीर्य वाढले आहे.याची तत्काळ दखल घेत घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांनी भेट दिली आहे.व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी नकुल ठाकरे व तुषार सोनवणे यास शोधून काढले मात्र या दोन आरोपीनी पोलिसांना पाहून धूम ठोकली होती.मात्र पोलिसांनी सावधानता दाखवत त्यांचा पाठलाग करून जेरबंद केले आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.पोलिसांनी हिसका दाखवला असता मुख्य आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे.व आपल्या बहिणीचा आगामी काळात एक महत्वपूर्ण कार्यक्रम असून सोडण्यासाठी गयावया केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणी आरोपी विरुद्ध फिर्यादीचा गुन्हा र.नोंद.क्रं.३८४/२०२२ भा.द.वि.कलम-३०७ ,१४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे फिर्यादी अभिजित दवंगे (वय-२६)रा.धारणगाव रोड,कोपरगाव याने दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत.