गुन्हे विषयक
शिर्डीत पाच जणांचा तरुणीवर सामूहिक अत्याचार! दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी या श्री साईबाबांच्या पावन भूमीत पाच नराधम आरोपींनी एका २१ वर्षे वयाच्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला असून या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान एक घटना पुणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या तरुणीबाबद असून दुसरी घटना नगर औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाली असून ती शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.त्यातील पुण्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या तरुणीचा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे दाखल झाला आहे.तर दुसरा नगर औद्योगिक वसाहत पोलीस अधिकारी तपास करत आहे.त्याला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”नगर परिसरातील परिसरातील एक २१ वर्षाची तरुणी शिर्डीत आली असता ती मंदिर परिसरात थांबली होती,त्यावेळी अनोळखी पाच नराधम तरुणांनी रात्रीच्या वेळी त्या गरीब तरुण मुलीला,”आम्ही तुला जेवण देतो”असे आमिष दाखवून एका शिर्डीतील खोलीत नेले व तेथे तिचे हातपाय बांधून,तोंडात बोळा कोंबून, तिच्या अंगावरील कपडे कात्रीने कापून एका-एकाने जबरदस्तीने आळीपाळीने पीडित तरुणीवर शारीरिक अत्याचार केले आहे.या घटनेने हादरून गेलेली तरुणी कशीबशी सावरली तिला सध्या जिल्ह्यातल्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून रुग्णालयात तिने वरील प्रमाणे जबाब दिल्यावरून अज्ञात पाच नराधम आरोपीं विरुद्ध शिर्डी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
दरम्यान घटनास्थळी उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी भेट दिली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाठक हे करीत आहे.साई बाबांच्या शिर्डीत गुन्हेगारांचे वास्तव्य वाढले असून आजूबाजूच्या परिसरातील गुन्हेगारांबरोबरच बाहेरचे गुन्हेगारही शिर्डीत राहत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पोलिसांपुढे या गुन्ह्यातील आरोपी पकडणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
दरम्यान सदर प्रकार समोर आल्यानंतर दुसऱ्या घटनेत शिर्डीतच पुन्हा एका तीस वर्षे वयाच्या तरुणीला शिर्डीतीलच आरोपी अर्जुन सिताराम पवार राहणार वीरभद्र पार्किंग साई कॉम्प्लेक्स समोर शिर्डी या आरोपीने,” मी तुझ्याशी लग्न करीन” असे लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी शिर्डी येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानक परिसरातील एका हॉटेलवर नेऊन पीडित तरुणीवर शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार काल पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावर आरोपी अर्जुन सिताराम पवार विरुद्ध भा.द.वि. कलम ३७६,५०४ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पो.नि.गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.स.पो.नी.पाटील हे पुढील तपास करीत आहे.पीडीत तरुणी पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजते.शिर्डीत अवैध अनैतिक कामासाठी लॉज,हॉटेलचा वापर होतो हे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.अनेक भक्तांना चोरीचा अथवा तत्सम त्रास झाला तरी बाहेरून आल्याने फिर्याद देणे टाळतात त्यामुळे अनेक गुन्ह्याचे प्रकार समोर येत नाही.त्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे.