जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरासह तालुक्यात चोरीचे सत्र सुरु,नागरिक हैराण !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील शेतकरी यांची ६ हजार रुपये किमतीची विद्युत मोटार तर शहरात राजेंद्र गायकवाड यांची १० हजार रुपये किमतीची हिरो होंडा सी.डी.डॉन हि दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याने कोपरगाव शहरासह तालुक्यात वाहन मालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात वारंवार चोरीचे सत्र सुरु असून चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत असून अशीच घटना ब्राम्हणगाव शिवारात घडली असून तेथील शेतकरी माधव लक्ष्मण तडाखे यांची विद्युत मोटार अज्ञातच चोरट्याने लंपास केली दुसरी घटना गोकुळनगरी येथे रहिवासी असलेले संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करत असलेले कर्मचारी राजेंद्र भीमराज गायकवाड यांचे दुचाकीबाबत घडली आहे.

कोपरगाव तालुक्यात वारंवार चोरीचे सत्र सुरु असून चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत असून अशीच घटना ब्राम्हणगाव शिवारात घडली असून तेथील शेतकरी माधव लक्ष्मण तडाखे यांची विद्युत मोटार अज्ञातच चोरट्याने लंपास केली दुसरी घटना गोकुळनगरी येथे रहिवासी असलेले संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करत असलेले कर्मचारी राजेंद्र भीमराज गायकवाड यांची हिरो होंडा सी.डी.डॉन (क्रं.एम.एच.१७ क्यु.४४३७) हि कोपरगाव बस स्थानकावरून अज्ञातच चोरट्याने चोरून नेली असल्याची घडली असून त्यांनी अनुक्रमे तालुका व शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यांच्या बस स्थानकावरील चोरीचे चलचित्रण त्यांना उपलब्ध झाले आहे.त्यातच चोरटा त्यांची दुचाकी आरामात चोरून नेताना दिसत आहे.त्या घटनेला सहा दिवस उलटूनही चोरट्यांचा तपास शहर पोलिसांना लागलेला नाही हे विशेष !

या प्रकरणी फिर्यादी पहिल्या घटनेतील फिर्यादी माधव तडाखे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तर राजेंद्र गायकवाड यांनी शहर पोलिसांत धाव घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही घटनास्थळी तालुका व शहर पोलीसांनी निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४४९/२०२२ तर दुसरा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात क्रं.३५८/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे तर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close