गुन्हे विषयक
तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या,कोपरगाव पोलिसांत नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला तरुण अहिंद्रेस छंदू काळे (वय-२२) याने आज सकाळी १०.३० ते १०.४५ वाजेच्या दरम्यान आपल्या स्वयंपाक खोलीच्या छतास धोतराच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.याबाबत त्याच्या पत्नीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान मयताचे दोन भाऊ गत महिन्यात संवत्सर येथील सोनवणे यांच्या वस्तीवर पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात बंदिस्त असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याच्या निधनाने त्याच्या नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे.त्याच्या निधनाने विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत तरुण अहिंद्रेस काळे हा आपले आई-वडील व आपल्या पत्नीसह पढेगाव शिवारात पंचेचाळीस चारीस राहत होता.त्याचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते.मात्र तो काही दिवसा पासून तणावात होता.मात्र आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्याने आपल्या पत्नीस अंघोळीस पाणी आणण्यास सांगितले होते.ती पाणी आणण्यास गेली असता त्यानंतर घरात कोणी नाही अशी वेळ साधत त्याने १०.३० ते १०.४५ वाजेच्या सुमारास आपल्या स्वयंपाक घराच्या छतास धोतराच्या सहाय्याने गळफास घेतला आहे.हि बाब त्याच्या पत्नी दीपाली काळेच्या लक्षात आली आहे.तिने याबाबत आरडाओरडा केला व नजीकच्या नातेवाईकांना बोलावून त्यास खाली उतरवले आहे.व त्यास तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकांऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.
दरम्यान त्याची पत्नी दीपाली काळे हिने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे.त्याचा शव विच्छेदन अहवाल अद्याप अप्राप्त आहे.तो आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.त्यानंतर पुढील तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे.
दरम्यान मयताचे दोन भाऊ गत महिन्यात संवत्सर येथील सोनवणे यांच्या वस्तीवर पडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात बंदिस्त असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याच्या निधनाने त्याच्या नातेवाईकांनी शोक व्यक्त केला आहे.त्याच्या निधनाने विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहे.दरम्यान घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पोलीस नाईक सी.बी.काळे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद क्रं.६४/२०२२ सी.आर.पी.सी.प्रमाणे नोंद आपल्या दप्तरी दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काळे हे करत आहेत.