गुन्हे विषयक
महाविद्यालयीन तरुणीची हत्या की आत्महत्या ? कोपरगाव तालुक्यात चर्चेला उधाण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या नगर-मनमाड महामार्गालगत भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी कु. (वय-१७) हिने दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० पूर्वी आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने लोखंडी पलंगाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दखल झाला आहे मात्र घटनेनंतर मयत मूलीची बहीण घटनास्थळावरून बेपत्ता झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणात मयत मुलीची बहीण या घटनेनंतर बेपत्ता झाली आहे.त्यामुळे हि हत्या की आत्महत्या ? असा सवाल निर्माण झाला आहे.या घटनेने पोलीस अधिकारी चक्रावुंन गेले आहे.त्यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मयत म उलीवर कोपरगाव अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.कोपरगाव शहर पोलिसांपुढे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत मुलगी हिचे वडील हे समृद्धी महामार्गावर वाहनावर चालक असून घरात आई,एक मोठी बहीण,एक लहान भाऊ असा परिवार असून आहे. ती नगर-मनमाड रस्त्यालगत कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असून मयत मुलगी हि सोमैय्या महाविद्यालयात अकरावी शास्त्र विषयात शिक्षण घेत होती.मात्र तिने अज्ञात कारणाने दि.३० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० नंतर आपल्या राहत्या घरात पलंगाला दोरी अडकून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.मात्र पलंगाला दोरी अडकवून आत्महत्या केली आहे.मात्र पलंगाला अडकवून आत्महत्या कशी केली ? हे न समजणारे कोडे आहे.याबाबत पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता ते हि त्याचे उत्तर समपर्कपणे देऊ शकले नाही.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणात मयत मुलीची बहीण या घटनेनंतर बेपत्ता झाली आहे.त्यामुळे हि हत्या की आत्महत्या ? असा सवाल निर्माण झाला आहे.या घटनेने पोलीस अधिकारी चक्रावुंन गेले आहे.त्यांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मयत म उलीवर कोपरगाव अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.कोपरगाव शहर पोलिसांपुढे या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
या प्रकरणी “खबर देणार हे केशव श्रीरंग दळवी (वय-४४) रा.भन्साळी ट्रॅक्टर जवळ कोकमठाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रं.६०/२०२२ सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पुंड हे करित आहेत.