गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात..या ठिकाणी रब्बी हंगाम पुर्वतयारी कार्यशाळा संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मल्हारवाडी येथे रब्बी हंगाम पुर्वतयारी कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी माधुरी गावडे यांनी शेतकऱ्यांना रब्बी हरबारा पिकच्या बीज प्रक्रीया,बियाणे निवड,सुधारीत जाती,खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,रोग व किडी विषयी सविस्तर माहीती दिली आहे.
सदर प्रसंगी कृषी पर्यवेक्षक विशाल साबदे यांनी कांदा पिकाच्या बद्दल सविस्तर माहीती दिली.कृषी सहायक सुनिल घारकर यांनी कृषी विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या शेतीशळा,यांत्रिकीकरण,अपघात विमा,पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना या बाबत सविस्तर माहीती दिली आहे.
या प्रसंगी प्रगतशील शेतकरी बाबासाहेब गुंजाळ यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या शेतीशळा मुळे फायदा होत असल्याचे मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी संजय वेताळ,साहेबराव गुंजाळ,मछिंद्र शिंदे,दत्तु शिंदे,बाबासाहेब रोडे सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार रावसाहेब कोल्हे यांनी मानले आहे.