गुन्हे विषयक
एकास मारहाण,कोपरगावात नऊ जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादी हा ओगदी गावात दुपारी १२ वाजेच्या सुमारास थांबलेला असताना आरोपी बाळासाहेब जोरवर,नवनाथ जोरवर व त्यांचे कुटुंबातील अन्य सात असे नऊ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण करुन ग्रामपंचायत खोलीत कोंडून ठेवले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी भाऊराव चिंधु पवार (वय-३७) याने आरोपी विरुद्ध ऍट्रॉसिटी कायद्याने गुन्हा तर फिर्यादी विरुद्ध विनयभंगाचा दाखल केल्याने ओगदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी हा काही कामासाठी मंगळवार दि.२६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ओगदी शिवारात गेला असता.त्या ठिकाणी आरोपी उपसरपंच बाळासाहेब जोरवर,नवनाथ जोरवर व त्यांचे कुटूंबातील नऊ जणांनी हातात लाकडी दांडे आणून फिर्यादिस जातीवाचक शिवीगाळ करून दांड्याने मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून आरोपीने पाझर तलावातील मासे पकडण्याचा लिलाव घेतला होता त्याची वसुलीचा उपसरपंच यांनी तगादा लावला होता.याचा राग मनात धरून आरोपीने हे कुभांड रचल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी तरुण हा कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी आहे.तो आपल्या काही कामासाठी मंगळवार दि.२६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ओगदी शिवारात गेला असता.त्या ठिकाणी आरोपी बाळासाहेब जोरवर,(हा आरोपी हा ग्रामपंचायतीचा उपसरपंच असल्याची माहिती मिळाली आहे.) नवनाथ जोरवर व त्यांचे कुटूंबातील अन्य सात जण हे तीन गाड्यावर टिबल शीट आले व त्यांनी हातात लाकडी दांडे आणून फिर्यादिस जातीवाचक शिवीगाळ करून दांड्याने डोक्यात,पाठीवर,हातावर,मांडीवर,पोटऱ्यांवर शरीरावर मारहाण करून ग्रामपंचायतच्या खोलीत डांबून ठेवले होते.
दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादिस ओगदी ग्रापंचायतीने गत वर्षी मासे पकडण्याचा ठेका दिला होता व त्याचा कालावधी संपुनही सदर बिल ग्रामपंचायतीस प्राप्त झाले नव्हते त्यामुळे उपसरपंच जोरवर यांनी त्याचा तगादा लावला होता त्याचा राग मनात धरून फिर्यादीने हे कुभांड रचले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोपीच्या एका नातेवाईक महिलेने फिर्यादी इसमाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा क्रं.२८८ २०२२ भा.द.वि.कलम ३५४,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.त्यात यात्रेच्या कारणावरून उपसरपंचाबाबत विचारून फिर्यादिस भिलाटीचा अध्यक्ष पवार याने शिवीगाळ व दमदाटी करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी फिर्यादीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याने ओगदी आणि ब्राम्हणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी इसमाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी आरोपी जोरवर व सात जणांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.२८७/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,३४२,१४३,१४७,१४८,१४९ अ.जाती जमाती प्र.का. कलम (३)(१)(आर)३(१)(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील याचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सातव हे करीत आहेत.