गुन्हे विषयक
कोट्यावधींची लुट करणारा…हा आरोपी अखेर पोलीसांनीं केला जेरबंद !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संपूर्ण महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यातील अनेक नागरीकांना स्वस्तात सिमेंट व स्टील देवून दुप्पट पैशाची कमाई करु देतो म्हणुन हजारो नागरीकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणारा इचलकरंजी येथील महाठक शिवानंद दादु कुंभार (वय-४६ वर्षे) याला बेळगाव पोलीसांनी गजाआड केले असून बेळगाव पोलीसांनी कर्नाटकी खाक्या दाखवताच शिवानंद कुंभार याने आपल्या सर्व काळ्या कारणाम्याची कबुली देत आपण नागरीकांना फसवुन कोट्यावधी रुपये घेतल्याचे कबुल केले असल्याची बातमी आहे.
गेल्या वर्षभरापासून शिवानंद कुंभार हा फरार होता.तो विदेशात गेल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार बेळगावचे पोलीस शिवानंद कुंभारच्या शोधात होते.पोलीसांनी विदेशी दुतवास व इंटरपोलच्या मदतीने बेळगाव पोलीसांनी नेपाळच्या पोलीसांशी संपर्क साधुन अधिक माहीती घेतली असता.शिवानंद कुंभार हा आपल्या पत्नी मुलांसह मालदीव,इजिप्त मार्गे दुबई फिरुन नेपाळ येथे आला असुन तो मुंबई येथे २६ जून रोजी वेश बदलून येणार असल्याची माहीती बेळगावच्या पोलीसांना मिळाली होती.
या घटनेची अधिक माहीती अशी की,”शिवानंद कुंभार याने अ,नगर नाशिक बीड, कोल्हापुर,सांगली जिल्ह्यातील बहुतांश नागरीकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवुन दिलेले पैसे स्टिल सिमेंटमध्ये गुंतवणुक करीत असल्याने अवघ्या काही महिन्यात दुप्पट पैसे देणार अशी खाञी दिली सुरुवातील काही वर्षे त्याने गुंतवणुकदारांना वेळेत परतावा देवुन अनेकांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासाच्या बळावर गुंतवणुकदारांनी हजारातील गुंतवणुक लाखात व लाखातुन कोटीत गुंतवणुक करण्यास सुरुवात केली.काहींनी आपली स्थावर मालमत्ता विकून तसेच नातेवाईकांकडून उसने पासने पैसे घेवून शिवानंद कुंभार याच्याकडे गु़ंतवली होती..
राज्यातुन अंदाजे दिडशे कोटीची रुपयाची गुंतवणुक झाली.कमी वेळेत मुबलक पैसा जमा होताच शिवानंद अचानक गायब झालाहोता.शिवानंद कुंभार गायब होताच हजारो गुंतवणुकदार रस्त्यावर आले.अनेकांचे संसार उध्वस्त झाले.काही गुंतवणुकदारांनी पोलीसात तक्रार दाखल केली अशाच तक्रारी कर्नाटक पोलीसांकडे आल्या होत्या.कर्नाटक पेक्षा महाराष्टातील विशेषतः अ.नगर व कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक नागरीकांना व व्यापाऱ्यांना शिवानंद कुंभार याने फसवले.परंतु महाराष्ट्र पोलीसांनी शिवानंदला पकड्या ऐवजी कर्नाटकच्या पोलीसांनी या महाठकास पकडुन गजाआड केले.
गेल्या वर्षभरापासून शिवानंद कुंभार हा फरार होता.तो विदेशात गेल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती.त्यानुसार बेळगावचे पोलीस शिवानंद कुंभारच्या शोधात होते.पोलीसांनी विदेशी दुतवास व इंटरपोलच्या मदतीने बेळगाव पोलीसांनी नेपाळच्या पोलीसांशी संपर्क साधुन अधिक माहीती घेतली असता.शिवानंद कुंभार हा आपल्या पत्नी मुलांसह मालदीव,इजिप्त मार्गे दुबई फिरुन नेपाळ येथे आला असुन तो मुंबई येथे २६ जून रोजी वेश बदलून येणार असल्याची माहीती बेळगावच्या पोलीसांना मिळाली आहे.
त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून ठक शिवानंद कुंभार याला २६ जुन रोजी पोलीसांनी बेड्या ठोकल्या अशी माहीती पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या यांनी माध्यमांना दिली.त्याला अटक केल्यानंतर त्यांच्या जवळील रोख २० लाख रुपये ताब्यात घेवून शिवानंद कुंभार नावाने असलेले सर्व बॅंक खाते गोठवण्यात आली आहेत.शिवानंद कुंभार याला अटक करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक निंगन गौडा पाटील,पोलीस निरीक्षक बी.आर.गड्डेकर,काडय्या चरलिंगमठ,महेश वडियार व त्यांच्या सहकार्यांनी हि धाडशी कारवाई केली आहे.
शिवानंद कुंभार याला पोलीसांनी पकडल्याने गुंतवणुकदारांनी गुंतवलेले पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.