गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा जोरात,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत अवैध वाळू उपसा जोरात सुरु असून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत दोन ट्रॅक्टर वाळू चोरी करताना मुद्दे मालासहित जप्त केले आहे.यातील आरोपी संदीप पवार,प्रवीण जाधव,सचिन थोरात,शामा बगाटे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाळू चोरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोदावरी नदी पात्रात वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग नोंदवला आहे.व आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी (?) दाखवून दिली आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.त्यामुळे आगामी काही वर्षात गोदावरी नजीकची शेती उध्वस्त झाली तर आश्चर्य वाटावयास नको.अशीच घटना नुकतीच सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत घडली असून या ठिकाणी अवैध वाळू उपसा जोरात सुरु असल्याची गुप्त खबर गुन्हे नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती.
त्याप्रमाणे त्यांनी सोमवार दि.१३ जून रोजी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपी संदीप रोहिदास पवार (वय-३०) सांगवी भुसार,प्रवीण रमेश जाधव (वय-२९) रा.सदर,सचिन थोरात व शामा बगाटे (दोघांचे पूर्ण नाव माहिती नाही) आदी वाळू चोर हे चोरी करताना आढळून आले होते.त्यांनी त्यासाठी ०५ लाख रुपये किमतीचा सिल्व्हर रंगाचा आयशर ४८५ कंपनीचा ट्रॅक्टर (क्रं.एम.एच.१७ ए. ई.८९०२) त्यास लाल रंगाची ट्रॉली,तर दुसरा ०५ लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा सोनालीका डी.आय.४२ आर.एक्स.कंपनीचा त्याला लाल रंगाची ट्रॉली १० हजार रुपये किमतीच्या वाळुसह आढळून आले आहे.यातील दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणी फिर्यादी राहुल भाऊसाहेब सोळुंके नगर स्थानिक गुन्हे शाखा यांनी वरील चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१९/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,३४ सह पर्यावरण अधिनियम ०३,१५ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.