गुन्हे विषयक
कोपरगाव शहरात दुचाकी चोरीची चोरी कार्यरत

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व परिसरात दुचाकी चोरी करत असलेल्या चोरट्यांना नुकतेच कोपरगाव शहर पोलिसानी जेरबंद केले असून त्यातील कोपरगाव बेट येथील आरोपी गोविंद संजय शिंदे यास रंगेहात पकडले असून त्याला पोलिसी हिसका दाखवला असता त्याने आपल्या अन्य साथीदारांची नावे सांगितली आहे.त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आशिष रामकीसन कोहरी (वय-२०),नाना पानसरे आदीं तीन जणांना जेरबंद केले आहे.या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
कोपरंगाव शहरात संशयित आरोपी गोविंद शिंदे याचे कडे चोरीची दुचाकी असून तो शिर्डी रस्त्यावर थांबलेला आहे.त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी त्यांना तशा वर्णनाची व्यक्ती आढळून आली आहे.त्यांनी त्यास ताब्यात घेतले व त्याच कसून शोध घेतला असता त्याने कबुली देऊन अन्य आरोपींची नावे सांगितली आहे.त्यातील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.एक जण फरार आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात दुचाकी चोरांचा सुकाळ झाला असून अनेकांच्या दुकाची,चार चाकी वहाने चोरीस गेल्याचे गुन्हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत व होत आहेत.
यातील फिर्यादी किशोर निवृत्ती दिघे (वय-२९) यांची हिरो होंडा स्प्लेंडर चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला असता त्या दुचाकींचा शोध घेत असता पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की,”कोपरंगाव शहरात संशयित आरोपी गोविंद शिंदे याचे कडे चोरीची दुचाकी असून तो शिर्डी रस्त्यावर थांबलेला आहे.त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता त्या ठिकाणी त्यांना तशा वर्णनाची व्यक्ती आढळून आली आहे.त्यांनी त्यास ताब्यात घेतले व त्याच कसून शोध घेतला असता त्याने कबुली देऊन अन्य आरोपींची नावे सांगितली आहे.त्यात या गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यात आरोपीने आशिष राममिलन कोहरी (वय-२०) रा.पुणतांबा चौफुली मूळ रा.मंगोली पो.जगदिशपूर ता.मुशाफिरी खाना जि.अमेठी उत्तर प्रदेश,नाना पानसरे पूर्ण नाव उपलब्ध नाही.रा.कोपरगाव आदींनी कोपरगाव शहर व परिसरात जवळपास ०८ लाख ३० हजार किमतीच्या २० दुचाकी चोरल्या असल्याने निष्पन्न झाले आहे.
यात सोळा होंडा कंपनीच्या दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यात स्प्लेंडर प्लस,होंडा सिटी,हिरो पॅशन,ऍक्टिव्हा,होंडा शाईन,होंडा युनींकाँर्न,एच.एफ.डिलक्स,एक बजाज बजाज पल्सर तर अन्य एक दुचाकी आदी कंपनीच्या वीस दुचाकी गाड्या चोरीत असल्याचे निष्पन्न झाल्या आहे.
प्रथम फिर्यादी फिर्यादी किशोर निवृत्ती दिघे यांनी आपली दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा क्रं.१३६/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दि.१९ मे रोजी दाखल केला असता हा भंडाफोड झाला आहे.यातील प्रमुख आरोपी गोविंद शिंदे व आशिष कोहरी आदींना अटक केली असून यातील नाना पानसरे हा फरार झाला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड,पो.कॉ.जे.पी.तमनर,संभाजी शिंदे,राम खारतोडे गणेश काकडे आदींनी मोलाची मदत केली असल्याची माहिती पोलीस अधिकारी देसले यांनी दिली आहे.या गुन्ह्यात अनेक वहाने निष्पन्न होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कोपरगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.