गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात मोठी चोरी,चार जणांवर गुन्हा,दोन जण जेरबंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत असलेले आरोपी विलास वाल्मीक चव्हाण, गणेश वाल्मीक चव्हाण रा.धोत्रे,करण शंकर पवार,विशाल राजु पवार दोघे रा.भोजडे आदींनी महिंद्रा पिकअप व बजाज प्लॅटिक आदींच्या सहाय्याने सुरक्षा रक्षकास बांधून ठेवून सुमारे ०४ लाख ४३ हजार ६५० रुपये किंमतीचे ३३८ लोखंडी पाईप चोरून नेताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
समृद्धी महामार्गाचे राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस दिले असून ते भोजडे येथे सुरु आहे.त्याठिकाणी त्यांचा विविध साहित्याचा मोठा बारदाना असून त्या ठिकाणी मनुष्यबळ पुरेसे नाही असे माहिती असल्याने त्याच गावातील वरील आरोपीनी त्यावर पाळत ठेवून त्या ठिकाणी सोमवार दि.१६ मे रोजी सकाळी ०७ वाजेच्या सुमारास आरोपीनी सुरक्षा रक्षक यास बांधून ठेवून त्यास शिवीगाळ करून कोळ नदीच्या पुलाखाली ठेवलेले मोठा अवैज चोरून नेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात कोपरगाव तालुक्यातून राज्य सरकारचा महत्वाकांक्षी मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग अंतिम टप्यात आला आहे.याचे मूळ काम गायत्री कन्स्ट्रक्शन या कंपनीस दिले होते.मात्र ते निर्धारित वेळेत पूर्ण केले नाही.त्यामुळे ते राज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस दिले आहे.त्याचे काम भोजडे या गावी सुरु आहे.त्याठिकाणी त्यांचा विविध साहित्याचा मोठा बारदाना असून त्या ठिकाणी मनुष्यबळ पुरेसे नाही असे माहिती असल्याने त्याच गावातील वरील आरोपीनी त्यावर पाळत ठेवून त्या ठिकाणी सोमवार दि.१६ मे रोजी सकाळी ०७ वाजेच्या सुमारास आरोपीनी सुरक्षा रक्षक यास बांधून ठेवून त्यास शिवीगाळ करून कोळ नदीच्या पुलाखाली ठेवलेले ०१ लाख ४३ हजार रुपये किमतीचे ३३८ लोखंडी पाईप (प्रत्येकी किमंत ४२५) ०२ लाख ५० र रूपये किमतीची महिंद्रा बोलेरो गाडी (क्रं.एम.एच.१७ ए.जी.९८७४) व ५० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर (क्रं.एम.एच.१७ सी.क्यु.३७४६)असा एकूण ०४ लाख ४३ हजार ऐवज लंपास केला होता.
याबाबत फिर्यादी प्रवीण भरत निंबाळकर (वय-३६) रा.निंबळक ता.फलटण जि.सातारा.हल्ली रा.चांदेकासारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात विलास वाल्मीक चव्हाण,गणेश वाल्मीक चव्हाण रा.धोत्रे,करण शंकर पवार,विशाल राजु पवार दोघे रा.भोजडे आदी चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१७४/२०२२ भा.द.वि.कलम ३४२)३९२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यातील दोन आरोपी विलास वाल्मीक चव्हाण,गणेश वाल्मीक चव्हाण रा.धोत्रे यांना कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे.तर यातील ०१ लाख ४३ हजार ६५० किमतीचे ३३८ लोखंडी पाईप व महिंद्रा पिकअप आणि बजाज प्लॅटिना जप्त केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.