गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलगी गायब,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत काळे वस्ती जवळ रहिवासी असलेली फिर्यादी (वय-४५) पित्याची अल्पवयीन मुलगी (वय-१४ वर्ष १० महिने) हिला अज्ञात इसमाने दि.२६ एप्रिल रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्यादी मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कुंभारीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.शहर व तालुक्यात चार महिन्यात जवळपास शंभरावर मुली अशा बेपत्ता झाल्या आहेत.हा एक अलीकडील काळात धक्कादायक विक्रम आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होत आहे.याबाबत पालक आणि मुलांमध्ये जागृती करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत शिवारातील काळे वस्ती नजीक दुसऱ्यांदा घडल्याची नागरिकांत चर्चा आहे.त्यामुळे कुंभारी व परिसरात खळबळ उडाली आहे.
त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्याद मुलीचे वडील हे कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील काळे वस्ती नजीक रहिवासी असून त्यांचा मजुरीचा व्यवसाय आहे.तेथे ते आपल्या पत्नी,आई,वडील,व आपल्या सुमारे पंधरा वर्षीय मुलीसह आपल्या छोट्या घरात राहतात.बुधवार दि.२६ एप्रिल रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने आपली मुलगी काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून त्यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस नाईक आर.टी.चव्हाण यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१५३/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.