गुन्हे विषयक
पन्नास हजारासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“तू,”माहेरच्या लोकांशी संपर्क ठेऊ नको,”ठेवायचे असल्यास माहेराहून ५० हजार रुपये आणावे” असे म्हणून आपला हाणमार करून,शिवीगाळ करून मानसिक शारीरिक छळ केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला ऋतुजा संकेत कापसे (वय-२०)ह.कारवाडी ता.कोपरगाव रा.हिने आरोपी नवरा संकेत कैलास कापसे,संगीता कैलास कापसे,शुभम कैलास कापसे सर्व रा.बारागाव पिंप्री ता.सिन्नर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव,सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बारागाव पिंप्री येथील तरुण संकेत कापसे याचेशी दि.२० जानेवारी २०२० रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचा काळ संपल्यावर सासरचे लोक सदर महिलेला त्रास देऊ लागले हॊते.तुझ्या माहेराहून पैसे आणावे यासाठी तगादा लावू लागले होते.शेवटी शेवटी तर “तू, तुझ्या माहेरच्यांशी संबंध ठेवू नको,ठेवायचे असल्यास तू माहेराहून रुपये पन्नास हजार रुपये आणावे” अशी मागणी होऊ लागली होती.त्यातून हा गुन्हा दाखल झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादीचे माहेर हे कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील असून तिचे लग्न हे बारागाव पिंप्री येथील तरुण संकेत कापसे याचेशी दि.२० जानेवारी २०२० रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले होते.नव्या नवलाईचा काळ संपल्यावर सासरचे लोक सदर महिलेला त्रास देऊ लागले हॊते.तुझ्या माहेराहून पैसे आणावे यासाठी तगादा लावू लागले होते.शेवटी शेवटी तर “तू, तुझ्या माहेरच्यांशी संबंध ठेवू नको,ठेवायचे असल्यास तू माहेराहून रुपये पन्नास हजार रुपये आणावे” अशी मागणी होऊ लागली होती.त्यातून आपला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी करून शारीरिक,मानसिक छळ सुरू झाला होता.
दि.०३ डिसेंबर २०२१ रोजी अखेर कंटाळून आपण आपल्या माहेरी आलो असून आरोपी नवरा आरोपी नवरा संकेत कैलास कापसे,संगीता कैलास कापसे,शुभम कैलास कापसे सर्व रा.बारागाव पिंप्री ता.सिन्नर यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव,सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी आधी या जोडप्याचे जिल्हा समुपदेशन केंद्रात समुपदेशन करण्यात आले मात्र उपयोग झाला नाही त्यामुळे अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.१४७/२०२२ भा.द.वि.कलम ४९८(अ),३२३५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी. चव्हाण हे करीत आहेत.