गुन्हे विषयक
मागील भांडणाचे कारणावरून मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानजीक जेऊर पाटोदा आनंदनगर हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादीच्या कोपरगाव हद्दीतील गॅरेज समोर काल दुपारी ०३ वाजेच्या सुमारास आरोपी नारायण चौधरी रा.शिंगवे,श्रीकांत गायकवाड रा.कोकमठाण ऋषिकेश त्रिभुवन रा.मोहिनीराज नगर आदी तिघांनी मागील भांडणाचे कारणावरून लोखंडी गजाने मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद गणेश सीताराम पावले (वय २४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
दि.२६ एप्रिल रोजी ०३ वाजेच्या सुमारास आरोपी आरोपी नारायण चौधरी रा.शिंगवे,श्रीकांत गायकवाड,ऋषिकेश त्रिभुवन आदी तिघांनी मागील भांडणाचे कारणावरून लोखंडी गजाने व लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद गणेश सीताराम पावले (वय २४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा जेऊर पाटोदा न नजीक आनंद नगर येथील रहिवासी असून त्यांचा कोपरगाव शहरात गॅरेजचा व्यवसाय आहे.मंगळवार दि.२६ एप्रिल रोजी ०३ वाजेच्या सुमारास आरोपी आरोपी नारायण चौधरी रा.शिंगवे,श्रीकांत गायकवाड,ऋषिकेश त्रिभुवन आदी तिघांनी मागील भांडणाचे कारणावरून लोखंडी गजाने व लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद गणेश सीताराम पावले (वय २४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेत फिर्यादी गणेश पावले हे गंभीर जखमी झाले आहे.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१०५/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए. एम.दारकुंडे हे करीत आहेत.