गुन्हे विषयक
नव्वद हजारांचे दागिने ओरबाडून चोरटे फरार,कोपरगावात गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीत परमेश्वरी लॉन्स जवळ दोन अनोळखी चोरट्यानी आपल्या ताब्यातील प्लसर दुचाकींचा वापर करून पायी चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून पळवले असल्याची फिर्याद तीनचारी कोकमठाण येथील महिला आशा उत्तम आव्हाड (वय-५४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
फिर्यादी महिला हि आपल्या जवळच्या नात्यातील एका लग्नास कोकमठाण येथील परमेश्वरी लॉन्स येथे दि.२१ एप्रिल रोजी आल्या होत्या.त्या दुपारी १.४० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व त्यांच्या सोबतच्या साक्षिदार या जात असताना तेथून बजाज पल्सर या दुचाकीवरून दोन चोरटे आले व त्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील वरील वर्णनाची सोन्याची तीन तोळे वजनाची पोत हिसकावून नेली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि आपल्या जवळच्या नात्यातील एका लग्नास कोकमठाण येथील परमेश्वरी लॉन्स येथे दि.२१ एप्रिल रोजी आल्या होत्या.त्या दुपारी १.४० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व त्यांच्या सोबतच्या साक्षिदार या जात असताना तेथून बजाज पल्सर या दुचाकीवरून दोन चोरटे आले व त्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील वरील वर्णनाची सोन्याची तीन तोळे वजनाची पोत हिसकावून नेली आहे.या घटनेने त्या हादरून गेल्या होत्या मात्र त्यांचे दागिने वाचविण्यास कोणीही पुढे आले नाही.अखेर त्यांनी आरडाओरडा करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.९३/२०२२ भा.द.वि.कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करित आहेत.