गुन्हे विषयक
टाकीत पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात दोघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले आरोपी संजय दगडू पगारे व त्यांचा मुलगा प्रशांत संजय पगारे यांनी पाण्याची टाकी भरण्याच्या कारणावरून आपल्याला बांबूच्या काठीने मारहाण केली असल्याचा गुन्हा फिर्यादी शांताराम दगडू पगारे (वय-६५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी आरोपी भाऊ संजय पगारे व पुतण्या प्रशांत पगारे हे तिथे आले व म्हणाले की,”आमची टाकी पहिली भरु द्या”,”नंतर तुमची भरा” त्यावेळी मी त्यांना म्हणालो की,”माझी टाकी रिकामी आहे आधी मला भरू द्या” असे म्हणाल्याचा राग आला व त्यांनी आरोपी भाऊ संजय पगारे याने आपले दोन्ही हात धरले व दुसरा आरोपी पुतण्या याने त्याच्या हातातील बांबूच्या काठीने आपल्या पाठीवर व कमरेवर मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शांताराम पगारे व त्याचा भाऊ संजय दगडू पगारे हे दोघे सोनेवाडी येथील रहिवासी असून सख्खे भाऊ आहेत.त्यांची शेती एकत्र असून त्यांनी आपल्या वस्तीवर पाण्याच्या पाण्यासाठी एकत्र जलवाहिनी आणली आहे.फिर्यादी शांताराम पगारे व पत्नी अंजना पगारे हे एकत्र राहातात.त्यांच्या शेजारीच त्यांचा भाऊ संजय पगारे आपल्या कुटूंबासमवेत राहतो.त्यांनी दोघांनी आपल्या घरगुती वापरासाठी पिण्याची जलवाहिनी आणलेली आहे.
बुधवार दि.२० एप्रिल रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास फिर्यादी शांताराम पगारे यांनी आपली पाण्याची टाकी भरण्यासाठी विहीरीवरील विद्युत पंप चालू केला असता तेथे आरोपी भाऊ संजय पगारे व पुतण्या प्रशांत पगारे हे तिथे आले व म्हणाले की,”आमची टाकी पहिली भरु द्या”,”नंतर तुमची भरा” त्यावेळी मी त्यांना म्हणालो की,”माझी टाकी रिकामी आहे आधी मला भरू द्या” असे म्हणाल्याचा राग आला व त्यांनी आरोपी भाऊ संजय पगारे याने आपले दोन्ही हात धरले व दुसरा आरोपी पुतण्या याने त्याच्या हातातील बांबूच्या काठीने आपल्या पाठीवर व कमरेवर मारहाण केली आहे.तसेच वाईट-साईट शिवीगाळ केली आहे.व म्हणाला की,”तुझे हात माय मोडून टाकू” अशी धमकी दिली आहे.
दरम्यान हा भांडणाचा आरडाओरडा ऐकून आपली पत्नी अंजना पगारे हि त्या ठिकाणी आली तिला तिला संजय पगारे याने लोटून दिले हा आवाज ऐकून माझा दुसरा भाऊ बाळासाहेब पगारे व भावजाई कुसुम पगारे आदी त्या ठिकाणी आले व त्यांनी मला त्यांच्या ताडीतून सोडवले आहे.
या प्रकरणी फिर्यादी शांताराम पगारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी भाऊ संजय पगारे व पुतण्या प्रशांत पगारे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१३९/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.महेश कुसारे हे करित आहेत.