गुन्हे विषयक
तांब्यांची तार चोरी,कोपरगावात आरोपीस ठोकल्या बेड्या !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राज्य महामंडळाच्या बस आगारातील भांडारगृहातून दि.१७ एप्रिल रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास चोरी केलेला १४ हजार ९४२ रुपयांचा तांब्याच्या तारेचा ऐवज अज्ञातच चोरट्याने पळवला होता.या प्रकरणी गुन्हा दाखल असताना कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेऊन अस्लम उमर कुरेशी (वय-२६) व समाधान प्रवीण पाटील (वय-२१) दोन्ही रा.सुभाषनगर या दोन भामट्यांना शहर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले आहे.
या चोरीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन करून त्यात पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,बी.एस.कोरेकर,पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे,जी.व्ही.काकडे,व्ही.एल.मासाळ संभाजी शिंदे आदींचा समावेश होता.त्यांनी आरोपींचा कसून शोध घेतला असता त्यात त्यांना अस्लम उमर कुरेशी रा.सुभाषनगर हा भामटा आढळून आला होता.त्यांना शहर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले होते.व त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने त्यात सामील असलेला त्याच भागातील आरोपी समाधान पाटील याचे नाव सांगितले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारातून रविवार दि.१७ एप्रिल रोजी पहाटे २.३० ते ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञातच चोरट्यांनी भांडार विभागातील १४ हजार ९४२ रुपयांची चांदीची तार लंपास केली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तेथील कर्मचारी बाबू तुळशीराम खरात (वय -५३) यांनी दाखल केली होती.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.९०/२०२२ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणी आपले लक्ष केंद्रित करून तपास सुरु केला होता.त्यांनी या प्रकरणी गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली होती की,”सदरची चोरी बस स्थानकाशेजारी असलेल्या सुभाषनगर येथील दोन आरोपीनीं केली आहे.त्या दृष्टीने त्यांनी तपास सुरु केला व त्यासाठी तपास पथक नेमले होते.त्यात पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,बी.एस.कोरेकर,पोलीस कॉन्स्टेबल राम खारतोडे,जी.व्ही.काकडे,व्ही.एल.मासाळ संभाजी शिंदे आदींचा समावेश होता.त्यांनी आरोपींचा कसून शोध घेतला असता त्यात त्यांना अस्लम उमर कुरेशी रा.सुभाषनगर हा भामटा आढळून आला होता.त्यांना शहर पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले होते.व त्यास पोलिसी हिसका दाखवला असता त्याने त्यात सामील असलेला त्याच भागातील आरोपी समाधान पाटील याचे नाव सांगितले आहे.
वरील दोन्ही आरोपीना पोलिसांनी जेरबंद केले आहे.व पंचासमक्ष यांचेकडून वरील माल ताब्यात घेतला आहे.
पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हॅक करीत आहेत.