गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालु क्यातून बोलकी ग्रामपंचायत हद्दीतील चांदर वस्ती येथील रहिवासी असलेले फिर्यादी समाधान देविदास राठोड (वय-२१) यांनी दि.१६ एप्रिल रोजी आपल्या राहते घरासमोर उभी करून ठेवलेली ७० हजार रुपये किमतीची फिक्कट काळ्या रंगाची होंडा कंपनीची पिवळे पट्टे असलेली सी.बी.शाईन हि दुचाकी अज्ञात चोरट्याने अज्ञात अकारणासाठी पळवून नेली आहे.
फिर्यादी समाधान राठोड याने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी आपल्या दप्तरी अज्ञात चोरट्या विरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.