गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात तरुणांचा विहिरीत पडून मृत्यू

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत दि.१८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तेथील तरुण अरुण अंबादास गोंधळें (वय-३५) हा पाच चारी येथील पानगव्हाने यांचे शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांना चालक दीपक रमेश गायकवाड (वय-३५) याची खबर दिली असून त्यांनी त्यात म्हटले आहे की,सदर तरुणांचा मृत्यू विहिरीत पडून झाला आहे.कोपरगाव तालुका आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू क्रं.२६/२०२२.सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.या घटनेने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रमुख दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पोलीस नाईक आर.टी. चव्हाण आदींनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करित आहेत.