गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात विळ्याने मारहाण,दोन जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात टाकळी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी अलका रामदास देवकर (वय-४५) महिलेस जयश्री सुनील देवकर शशिकला अण्णासाहेब देवकर व सुनील अण्णासाहेब देवकर,अमोल अण्णासाहेब देवकर,विजय अण्णासाहेब देवकर सर्व रा.टाकळी आदीं पाच जणांनी मागील भांडणाचे कारण उकरून काढून विळ्याने मारहाण केली असून त्यात अलका देवकर गौरव देवकर,आदी दोन जण जखमी झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते.त्याचा राग मनात धरून आरोपी जयश्री देवकर व शशिकला देवकर,सुनील देवकर अमोल देवकर,विजय देवकर आदी पाच आरोपीनी दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर येऊन गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अलका देवकर व साक्षिदार गौरव देवकर आदींना विळ्याने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला अलका देवकर व आरोपी जयश्री देवकर या एकाच गावातील रहिवासी असून त्यांच्यात काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते.त्याचा राग मनात धरून आरोपी जयश्री देवकर व शशिकला देवकर,सुनील देवकर अमोल देवकर,विजय देवकर आदी पाच आरोपीनी दि.२५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर येऊन गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी अलका देवकर व साक्षिदार गौरव देवकर आदींना विळ्याने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.व फिर्यादी महिलेच्या हाताला चावा घेऊन जखमी केले आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला अलका देवकर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.५०/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६१४३,१४७,१४८,१४९,अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.