जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

जागेच्या कारणावरून एकास मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा   

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या इसमाने आपल्या व्यवसायासाठी टपरीला जागा द्यावी अवैध अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी केली असता त्याच गावातील आरोपी यमराज नाना जावळे,शंकर पुंजा जावळे,किसन शिवराम जावळे आदींनी लोखंडी गजाच्या सहाय्याने नुकतीच मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा फिर्यादी अनिल रामदास लांडगे (वय-३४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे सोनेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर घटनेनंतर आपली तब्येत बरी नसल्याने आपण प्रारंभी कोपरगाव ग्रामीण रुग्णलयात व नंतर शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचार घेऊन आलो आहे.दरम्यान “यातील तिसरा आरोपी हा ग्रामपंचायतीचा उपसरपंच असून त्याने राजकीय आकसातून आपल्याला जागा मिळू दिली नाही असा आरोप केला असून फिर्यादीने सांगितले की,”आरोपीनी आपल्या अंगावर पेंट्रोल टाकले होते,मात्र उपस्थितांनी आपल्याला सोडवले असल्याने आपला जीव वाचला आहे”

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अनिल लांडगे हा सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नगदवाडी येथील रहिवासी आहे.त्याच्या घरात पत्नी जयश्री,मुलगा साई,आणि मुलगी आराध्या असा परिवार आहे.सदर कुटुंब मजुरी करून आपली उपजीविका चालवतात.दरम्यान त्याच गावातील आरोपी यमराज जावळे,शंकर जावळे,किसन जावळे हे रहिवासी आहे.फिर्यादी यांनी यापूर्वी सन-२०२० मध्ये आपल्याला व्यवसायासाठी जागा मिळावी यासाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केला होता.व जागा मागीतली होती.मात्र त्याकडे कानाडोळा करून संबंधितांनी आपल्याला जागा दिली नाही या उलट अन्य ग्रामस्थांना जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व बाजूस बेकायदेशीर गाळे बांधकाम करण्याचं काम सुरु केले आहे.ते काढण्याबाबत आपण रीतसर अर्ज केला असता त्याचा राग येऊन त्यातील यमराज नाना जावळे,शंकर पुंजा जावळे,किसन शिवराम जावळे सर्व रा.सोनेवाडी आदींनी दि.१३ ऑक्टोबर रोजी ३ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत समोर येऊन आपल्याला लोखंडी गजाने मारहाण केली आहे.किसान जावळे याने,”तू जर आमच्या नादी लागला तर,अंगावर पेट्रोल टाकून तूला जिंवत जाळून टाकील व तुझे घर जेसीबी लावून पाडून टाकील” असा सज्जड दम दिला आहे.दरम्यान घटनास्थळी उभा असलेल्या मच्छीन्द्र नामदेव गुडगे यांनी आमचे भांडण सोडवले आहे.दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आपण गुन्हा दाखल करण्यासाठी आपण व आपला भाऊ नामदेव लांडगे आलो असून गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर आपली तब्येत बरी नसल्याने आपण प्रारंभी कोपरगाव ग्रामीण रुग्णलयात व नंतर शिर्डी येथील श्री साईबाबा रुग्णालयात उपचार घेऊन आलो आहे.दरम्यान यातील तिसरा आरोपी हा ग्रामपंचायतीचा उपसरपंच असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.व राजकीय आकसातून आपल्याला जागा मिळू दिली जात नाही असा आरोप केला असून फिर्यादीने सांगितले की,”आरोपीनी आपल्या अंगावर पेंट्रोल टाकले होते,मात्र उपस्थितांनी आपल्याला सोडवले असल्याने आपला जीव वाचला” असल्याचा दावा केला आहे व मारहाणीच्या जखमा दाखवल्या आहे.मात्र त्यास पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.३९५/२०२२ भा.द.वि.१८६० कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.महेश कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close