जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात डिझल चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु असून सदर कामावर असलेल्या पोकलँड मधील सुमारे ११ हजार ९०६० रुपयांचे डिझल दि.१५ फेब्रुवारी रात्री ते १६ फेब्रुवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञातच चोरट्याने चोरून नेले असल्याचा गुन्हा फिर्यादी प्रवीण भरत निंबाळकर (वय-३५)ह.रा.चांदेकसारे मूळ रा.निंबळक ता.फलटण जिल्हा सातारा यांनी दाखल केला आहे.त्यामुळे वाहन चालकांत खळबळ उडाली आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गावरील ठेकेदारांच्या वाहनांमधील इंधन चोरी हा काळजीचा विषय ठरला असून या पूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे या चोरट्यांचा कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास करावा व या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन मालक व चालकांनी केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी हा मूळ सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून तो समृद्धी महामार्गावर काम करत असलेल्या राज इन्फ्राट्रक्टचर डेव्हलपमेंट प्रा.ली.या कंपनीच्या सेवेत पोकलँड चालविण्याचे काम करत आहे.त्यांनी आपला पोकलँड हा आपले काम आटोपल्यावर चांदेकसारे शिवारात उभा करून ठेवला असता.वरील दिनांकाच्या सायंकाळी सात वाजे नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्या पोकलँडवर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने रात्री केंव्हा तरी सदर मशीनच्या इंधन टाकीतील रुपये ११ हजार ९६० रुपयांचे १३० लिटर डिझल चोरून नेले आहे.

या प्रकरणी फिर्यादी प्रवीण निंबाळकर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तर घटनास्थळी सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे यांनी भेट दिली आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गावरील ठेकेदारांच्या वाहनांमधील इंधन चोरी हा काळजीचा विषय ठरला असून या पूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.त्यामुळे या चोरट्यांचा कोपरगाव तालुका पोलिसांनी तपास करावा व या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहन मालक व चालकांनी केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४८/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close