गुन्हे विषयक
चोरट्यांकडून जप्त केलेला माल कोपरगाव पोलिसांकडून फिर्यादिस परत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव ग्रामपंचायत हद्दीतील कासली-गोधेगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेले शेतकरी अशोक रांधवणे हे गत ११ मार्चला ७.४५ वाजता जेवण करत असताना अज्ञात तीन चोरट्यानी त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून,जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कडील मनिमंगळ सूत्रासह सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे ६० हजार रुपये किमतीचे दागिने पळवून नेल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी जेरबंद केले होते त्यांच्या कडून चोरीस गेलेला माल जप्त केला असून तो पोलिसांनी जप्त केला असून तो नुकताच फिर्यादिस पोलिसांनीं परत केला आहे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव शिवारातील चोरीचा ऐवज परत केल्या बद्दल फिर्यादी अशोक रांधवणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यासह मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळॆ,पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के पो.कॉ.अंबादास वाघ,जयदीप गवारे आदींचे आभार मानले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात चोरांनी आपला उपद्रव वाढवला होता.कोरोना काळात हि चोरी झाली होती.त्यामुळे हा शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना ठरला होता.अशी घटना कोपरगाव तालुक्यात गोधेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली होती.या बाबत फिर्यादी अशोक मारुती रांधवणे हे आपल्या गोधेगाव शिवारात कासली रोडलगत राहतात.दि.११ मार्च रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते आपल्या कुटुंबासोबत फराळ करत असताना त्या ठिकाणी घरात प्रवेश करून काही अज्ञात आरोपी आले व त्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना.”माल बतावो,”माल निकालो” अशा तोडक्या मोडक्या हिंदी भाषेचा वापर करत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले व अल्पावधीतच पोबारा केला होता.या गंभीर बाबीचा फिर्यादी अशोक रांधवणे यांनी रीतसर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तातडीने हालचाल केली असता त्यांनी संशयित गोधेगाव शिवारात शोध मोहीम राबविली असता त्यांना एक इसम गोधेगाव शिवारात रस्त्यालगत लपून बसलेला आढळला फिर्यादी यांनी वर्णन केल्या प्रमाणे त्याच्या अंगात फुल बाह्यांचा पिवळा “टी” शर्ट असल्याने पोलिसांचा संशय बळावला त्यांनी त्यास ताब्यात घेतले असता व त्याला आपला खाक्या दाखवला असता “तो” पोपटा प्रमाणे बोलू लागला व त्याने अन्य टाकळी लिफ्ट जवळ ता .कोपरगाव येथील आरोपी ऋषिकेश शंकर पैठणकर,राजेंद्र लक्ष्मण जाधव (वय-२४) आदींना शोध मोहीम सुरु करून रात्रीच ताब्यात घेतले आहे.ऋषीकेश पैठणकर याच्या ताब्यात अंगझडतीत साठ हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र मिळून आले होते.तर राजेंद्र लक्ष्मण जाधव हाही त्याच्या राहत्या घरी मिळून आला होता.त्यांच्या कडून बजाज प्लसर हि दुचाकी आढळून आली होती ती पोलिसानी जप्त केली होती.
या प्रकरणी पोलीस अधिकारी दौलतराव जाधव यांनी कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर दोषारोप पत्र सादर केले होते.गुंह्यातील वरील ऐवज नुकताच पोलीस अधिकारी जाधव यांनी फिर्यादी अशोक रांधवणे याना परत केले आहे.
या बद्दल त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्यासह मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळॆ,पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के पो.कॉ.अंबादास वाघ,जयदीप गवारे आदींचे आभार मानले आहे.