गुन्हे विषयक
ट्रकसह ९.०३ लाखांची चोरी प्रकरण,आरोपीं अद्याप फरार,मुद्देमाल जप्त नाही
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या ईशान्सेस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ उभा करून ठेवलेला टाटा कंपनीचा ०९ लाख रुपये किंमतीचा ट्रक (क्रं.-एम.एच.०४,ई.वाय.७१११) हा आरोपी शेटेफळ ता.बारामती येथील आरोपी छगन प्रल्हाद वाबळे यासह अन्य दोन अज्ञात आरोपीनी चोरून नेला असल्याचा गुन्हा चाळीसगाव चंडीकावाडी येथील फिर्यादी विलास कैलास चव्हाण (वय-२३) ट्रकचालक यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करून पावणे दोन महिने उलटूनही अद्याप चोरटे फरार असून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही.त्यामुळे ट्रॅकचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या ट्रकचोरी बाबत घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनीं घटनास्थळी भेट दिली होती.या प्रकरणी फिर्यादी विलास चव्हाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला होता.मात्र या गुन्ह्याच्या प्रगतीती अद्याप प्रगती दिसून आलेली नाही.मात्र विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक एका कर्जदाराने ओढून नेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्याला अधिकारीक पातळीवर दुजोरा मिळाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हा चंडीकावाडी पोष्ट पाटणादेवी ता.चाळीसगाव जिल्हा जाळगाव येथील रहिवासी आहे.त्यांचा स्वतःच्या मालकीचा वरील क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक आहे.दि.१५ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सदरचा ट्रक हा बारामती तालुक्यातील शेटेफळ येथील आरोपी छगन प्रल्हाद वाबळे व अन्य दोन आरोपीनी विनाक्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो या महिंद्रा कंपनीच्या जीप मध्ये येऊन संजीवनी सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ उभा करून ठेवलेला ०९ लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक फिर्यादीच्या संमतीशिवाय संगनमत करून लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला होता.त्या बरोबरच आरोपींनीं ०३ हजार रुपये किमतीचा जुना वापरता भ्रमणध्वनी त्यात एअरटेल कंपनीचे सिम कार्ड (क्रं.-९५२९७७७०९८) असा एकूण ०९ लाख ०३ हजार रुपये किमतीचा ऐवज पळवून लंपास केला होता.दरम्यान हा ट्रक पावणे दोन महिने उलटूनही अद्याप अद्याप जप्त केलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार एका एका कर्जदाराने ओढून नेल्याची माहिती अधिकारीक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३६२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाते हे करीत आहेत.मात्र द्याप आरोपी आणि मुद्देमाल जप्त केलेला नाही.त्यामुळे ट्रॅक चालकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.