जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अपघात एक ठार,एक जखमी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर रेल्वे पुलाच्या पश्चिमेस आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बजाज प्लॅटिना टी. व्ही.एस.स्टार या दोन दुचाकीच्या झालेल्या धडकेत वाहेगाव गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथील तरुण राजेंद्र बाबूंराव पगार (वय-३५) या तरुणांचे जागेवरच निधन झाले आहे तर जखमींना उपचारार्थ अन्यत्र रवाना केले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.मययाचा सहकारी प्रकरणी विष्णू अशोक मनाळ (वय-२२) रा.सदर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

आज दि.२१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वैजापूर कडून कोपरगावच्या दिशेने वेगाने वरील मयत व त्याचे अन्य सहकारी जात असताना त्यांना समोरून वैजापूरच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली होती. त्यात वरील तरुण राजेंद्र पगार हा वाहेगाव ता.गंगापूर येथील तरुण जागीच गतप्राण झाला आहे.तर त्याचा सहकारी विष्णू मनाळ जखमी झाले आहे.समोरच्या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातून मुंबई-नागपूर हा महामार्ग जात असून या राज्य मार्गाचे नूकतेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरु असते.एव्हढेच नव्हे ते या वाहानांचा वेग प्रचंड असतो त्यामुळे अलीकडील काळात अपघातांची मालिका मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.अशातच आज दुचाकीस्वार बजाज प्लॅटिना (क्रं.एम.एच.१७ सी.एन.०६३९) ( नाव उपलब्ध नाही) वरून दि.२१ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद कडून कोपरगावच्या दिशेने वेगाने वरील मयत व त्याचे अन्य सहकारी हे संवत्सर शिवारातून जात असताना त्याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या टि.व्ही.एस.स्टार दुचाकीची (क्रं.एम.एच.२० ई.एम.८९८४) हिने जात असताना त्यांना समोरून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली होती. त्यात वरील तरुण राजेंद्र पगार हा वाहेगाव ता.गंगापूर येथील तरुण जागीच गतप्राण झाला आहे.तर अन्य काही जखमी झाले आहे.त्याची नवे समजू शकली नाही.या अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

या बाबतची खबर नजीकच्या नागरिकांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कळवली होती.कोपरगाव शहर पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ जखमींना उपचारार्थ दवाखान्यात रवाना केले असून घटनास्थळी जागेचा पंचनामा केला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.११/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १३४(अ) (ब) १८४/१७७ प्रमाणे गुन्हा सायंकाळी ७.२९ च्या सुमारास दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close