गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी गायब,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ईशान्येस साधारण पंधरा कि.मी.अंतरावर असलेल्या वारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी व फिर्यादी असलेल्या मुलीच्या पित्याने (वय-४०) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांनी म्हटले आहे की,”आपली अल्पवयीन मुलगी (वय-१५) हि अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेली आहे.त्यामुळे वारीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथे घडली आहे.मात्र अद्याप तपास सुरु आहे.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीचा पिता हा वारी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.तेथे ते आपल्या पत्नी,आई,वडील,व आपल्या पंधरा वर्षीय मुलीसह आपल्या छोट्या कोपीत राहतात.मंगळवार दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते सकाळी ६.३० वाजे पूर्वी अज्ञात आरोपीने आपली मुलगी कोणी तरी अज्ञात इसमाने काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून त्यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक जाधव यानीब भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४००/२०२१ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.निजाम शेख हे करीत आहेत.