गुन्हे विषयक
संगमनेर खून प्रकरण,कोपरगावात आरोपी जेरबंद!
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील एका अनोळखी ३५ ते ४० वर्षीय महिलेची दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान हत्या करू फरार असलेल्या आरोपीला कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात कोपरगाव तालुका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्याची घटना बुधवारी घडली असून पोलिस अधिकाऱ्यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हयाबाबत अधिक माहीती प्राप्त करुन संशयीत इसमाचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता,नमुद फोटोतील इसम हा कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथे असल्याची माहीती मिळाली त्यानुसार कोपरगाव तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घुलेवाडी शिवारात श्रमीक विडी उद्योग संस्था यांचे घर नंबर ४२४ व गट नंबर ६३ मधील मोकळ्या जागेत पुणे नाशिक महामार्ग क्रमांक ५० येथे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अनोळखी स्त्रीस (वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष) जीवे ठार मारुन त्याचा पुरावा नाहीसा व्हावा म्हणून तीचे प्रेत सेप्टी टँकमध्ये नग्न अवस्थेत टाकून दिले होते.ही घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली होती.याबाबत फिर्याद महिला पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले नेमणुक संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६४४/२०२१ भा.द.वि.क. ३०२,२०१ गुन्हा दाखल करण्यात आला होता. संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हयाबाबत अधिक माहीती प्राप्त करुन संशयीत इसमाचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता, नमुद फोटोतील इसम हा कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथे असल्याची माहीती मिळाली. त्या बाबत सदर ठिकाणी तत्काळ पोलीस पथक रवाना झाले असता संशयीत इसम रुपचंद मुकुतराम वर्मा (वय ४५) वर्षे रा. गिरजा तहसील पलासी जि.बलोदाबाजार, राज्य छत्तीसगड यास ताब्यात घेईल व त्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे संबंधित गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्हयातील महिलेच्या खुनाची स्पष्ट कबुली दिली आहे . सदरची कौतुकास्पद कामगीरी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, स.फौ.सुरेश गागरे , पोहेकॉ एस.डी.बोटे,पो.ना.आर. टी. चव्हाण, पो.कॉ. अंबादास वाघ,पो. का.रमेश झडे, पो.कॉ.अनिस शेख , पो.कॉ.जयदिप गवारे,पो.कॉ.राघू कोतकर,पो.कॉ.रशिद शेख चालक,पो.कॉ.रामचंद्र साळुंके,पो.ना.फुरखान शेख , प्रमोद जाधव उपनिरीक्षक श्री शिंदे,पो.हे.कॉ.अमीत महाजन,पो.ना.विजय पवार, पो.का.अमृत आढाव, पो.कॉ. साईनाथ तळेकर यांनी केली असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे.