जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात ऍट्रॉसिटी दाखल,मागील गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या उत्तरेस साधारण सात कि. मी.अंतरावर असलेल्या येसगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने आपले घर व गाव सोडण्यास भाग पाडल्या प्रकरणी चितळी येथील आरोपी विश्वनाथ वाघ,येसगाव येथील आरोपी दिलीप निवृत्ती कदम,सचिन दिलीप कदम,दीपक दिलीप कदम यांनीं फिर्यादिस आवाज देवुन बाहेर बोलावुन घेतले व गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिलीप कदम व इतरा विरुध्द दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणावरुन फिर्यादीस व फिर्यादीचे आई,वडील,भाऊ अशांना शिवीगाळ करुन विश्वनाथ वाघ याने फिर्यादीचा हात धरुन फिर्यादीस ओढुन बाजूला ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तर इतरांनी फिर्यादीचे आई,वडील,भाऊ अशांना शिवीगाळ करून झोपडीतील सामान फेकून देऊन गावात राहण्यास मज्जाव केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान येसगाव येथील या घटनेतील चार आरोपी पैकी विश्वनाथ वाघ वगळता तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले असून बाकीच्या आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.मागील गुन्हा असाच असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,स्वातंत्र्यानंतरही अनुसूचित जाती आणि जमातीं विरोधातील न थांबलेले अत्याचार आणि कायद्याने त्यांना मिळणारं संरक्षण अपुरं पडत असल्याने हा कायदा आणण्यात आला.या कायद्यामुळे अनुसूचित जाती-जमातींविरोधात अत्याचार झाल्यास भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हे दाखल होतातच पण अ‍ॅट्रॉसिटीनुसारही गुन्हे दाखल केले जातात.अनुसूचित जाती आणि जमातींव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
दि.२२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ०१ वाजेच्या सुमारास चितळी ता.राहाता येथील आरोपी विश्वनाथ वाघ,दिलीप निवृत्ती कदम,सचिन दिलीप कदम,दीपक दिलीप कदम रा.येसगाव यांनीं अल्पवयीन फिर्यादी मुलगी हिस आवाज देवुन बाहेर बोलावुन घेतले व गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिलीप कदम व इतरा विरुध्द दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणावरुन फिर्यादीस व फिर्यादीचे आई,वडील,भाऊ अशांना शिवीगाळ करुन विश्वनाथ वाघ याने फिर्यादीचा हात धरुन फिर्यादीस ओढुन बाजूला ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तर इतरांनी फिर्यादीचे आई,वडील,भाऊ अशांना शिवीगाळ विश्वनाथ वाघ याने फिर्यादी तरुणीचा हात धरून तिला बाजूला ढकलून देऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.तसेच दीपक कदम याने फिर्यादीचे आईस धरले तर दिलीप व सचिन यांनी झोपडीतील सामान फेकून दिले व त्यांचा उल्लेख जातीवाचक करून तुम्ही खालच्या जातीचे आहेत.”आम्ही सर्व बहुसंख्याक एक होऊ” असे म्हणून धमकी दिली आहे.व “तुम्ही काय करणार आहे”.”केस काढून घेतली नाही तर हाकलून देऊ व वाळीत टाकू” अशी धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान चार आरोपी पैकी विश्वनाथ वाघ वगळता तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले असून विश्वनाथ वाघ याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.३९६/२०२१कलम १) भा.द.वि.क.३५४,४५२,३२३,४२७,५०४,५०६,३४ प्रमाणे २) अनुसूचित जाती /जमाती (अत्याचारास प्रतिबंध)सुधारणा कायदा-२०१५ विनयभंग-३(१)(डब्ल्यु) (१)(२) जातीवाचक शिवीगाळ-३(१)(एस)(आर) ३(२)(व्ही.-ए) ३) बळजबरीने घर,गाव किंवा अन्य निवास्थान सोडण्यास भाग पाडणे-३(१) (झेड) ४) लैगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम-२०१२ चे कलम-७,८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close