गुन्हे विषयक
घरात घुसून मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सावळगाव येथील रहिवासी असलेले फिर्यादी यांचे घरात घुसून आरोपी करण मोरे,सोन्या (पूर्ण नाव उपलब्ध नाही),विकास (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी दि.१८नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुपारी हॉटेल कारभारी येथील वेटर यांचेशी झालेल्या किरकोळ कारणावरून लाकडी दांड्याने आपल्याला व आपल्या पती विनायक तुळशीराम उकिरडे यांना मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद मोहिनी विनायक उकिरडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी शिरसगाव येथे शेतीचे सामान आणण्यासाठी गेले होते.येताना ते हॉटेल कारभारी येथे जेवण करण्यासाठी थांबले असता तेथे जेवणाचे ऑर्डर देण्याच्या कारणावरून तेथील वेटर सोन्या व विकास यांचेशी किरकोळ वाद झाले होते.त्या नंतर हॉटेलचे मालक कुणाल भुजाडे हे तेथे काही वेळाने आल्यावर त्यांनी ते सोडवले होते.मात्र रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तीन आरोपीनी घरात घुसून आपल्या पतीला व आपल्याला लाकडी दांडयाने मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला मोहिनी उकिरडे व त्यांचा पती हे सावळगाव येथील रहिवासी असून त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे.त्यांच्या घरात पती,सासू.भाया असे एकत्रित कुटुंब असून ते तेथे गुण्या गोविंदाने राहात आहे.त्याचे पती दि.१८ नोव्हेंबर रोजी सकाळी शिरसगाव येथे शेतीचे सामान आणण्यासाठी गेले होते.येताना ते हॉटेल कारभारी येथे जेवण करण्यासाठी थांबले असता तेथे जेवणाचे ऑर्डर देण्याच्या कारणावरून तेथील वेटर सोन्या व विकास यांचेशी किरकोळ वाद झाले होते.त्या नंतर हॉटेलचे मालक कुणाल भुजाडे हे तेथे काही वेळाने आल्यावर त्यांनी ते सोडवले होते.
त्या नंतर रात्री आपले पती विनायक उकीरडे व त्यांचे मित्र संदीप उकीरडे हे रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी आले असता.त्या नंतर साधारण अर्ध्या तासाने तेथे काही तरुण आमचे घरासमोर आले व त्यांनी आपल्या पतीला उद्देशून,”तुझ्यासोबत असणारा संदीप उकिरडे हा कोठे आहे”असा सवाल केला.त्याला आपल्या पतीने, ‘तो’ कुठे आहे हे मला माहिती नाही ? अशी माहिती दिली असता त्यांचे समाधान झाले नाही.दरम्यान ते घरात अनाधिकाराने घुसून घरात त्याचा शोध घेऊ लागले.तो घरात नसल्याचे पाहून त्यांनी आपल्या पतीची गचांडी पकडून,”तू ,”त्याला कोठे लपवून ठेवले आहे” असे म्हणून शिवीगाळ करू लागले.मी त्यांना सोडविण्यास गेले असता त्यांनी मलाही खाली लोटून दिले व त्यातील एकाने लाकडी दांड्याने आपल्या पतीच्या दोन्ही पायावर,पाठीवर मारहाण केली.मी पुन्हा मध्ये हि मारामारी सोडविण्यास गेले असता मलाही लाकडी दांड्याने दोन्ही हाताने व लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.ते घटनेनंतर निघून गेल्यावर आपल्या पतीने त्यांची नावे सांगितली व ते करण मोरे व सोन्या व विकास असे असल्याचे सांगितले आहे.या प्रकरणी आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३९२/२०२१ भा.द.वि.कलम ४५२,३२४,३२३,५०४,५०६ अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.वाखुरे हे करीत आहेत.