गुन्हे विषयक
जमीन हडप करण्याच्या उद्देशाने मारहाण,कोपरगावात कोल्हेंसह चौघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेली महिलेच्या जमिनीतील रस्त्यावर जे.सी.बी यंत्राच्या सहाय्याने नळ्या टाकून जमीन हडप करण्याचा प्रयत्न करताना त्याला हरकत घेतल्याने सदर महिलेला व तिच्या मुलांना आरोपी दिलीप सुरेश डुंबरे,सुरेश तुकाराम डुंबरे,रमेश गहिनाजी डुंबरे व कोपरगाव येथील एका शिक्षण संस्थेचे विश्वस्त कोल्हे सर्व रा.येसगाव यांनी शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली व “तुम्ही येथे परत आला तर तुम्हाला जीवे ठार मारू” अशी धमकी दिल्याचा गुन्हा फिर्यादी महिला सुलोचना यशवंत निमसे रा.निघोज यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकताच अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा दखलपात्र करावा अशी मागणी केली आहे.सदर गुन्ह्याने कोपरगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीची जमीन परस्पर खरेदी करुन देऊन त्यातून रस्ता केल्या प्रकरणी दावा दाखल केला आहे व त्या दाव्यात न्यायालयाने अंतिम कामकाज पूर्ण होईपर्यंत,”कोणत्याही प्रकारे पक्का रस्ता तयार करू नये” असा मनाई हुकूम दिलेला आहे.असे असताना शनिवार दि.१६ ऑक्टोबर रोजी अमित कोल्हे व डुंबरे कुटूंबियांनी आपल्या क्षेत्रात जे.सी.बी.च्या सहाय्याने जमीन उकरून पाईप टाकून आरोपीचे शेतातील पाणी आमच्या शेतात काढण्याचा प्रयत्न केला आहे.त्या वेळी त्याला फिर्यादी महिला सुलोचना निमसे व त्यांच्या मुलांनी त्यास हरकत घेतली त्यातून हा मारहाणीचा प्रकार उदभवला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला सुलोचना निमसे या निघोज येथील रहिवासी असून आरोपी दिलीप सुरेश डुंबरे,सुरेश डुंबरे,रमेश डुंबरे हे येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहेत.यातील फिर्यादी सुलोचना निमसे यांचे गट क्रं.६५/१ हे क्षेत्र सुलोचना निमसे,कमलेश निमसे,योगेश निमसे यांच्या मालकीचे आहे.असे असताना सिंधूबाई सुरेश डुंबरे,संतोष बाबासाहेब डुंबरे,साकराबाई गहिनाजी डुंबरे,सकाहारी गहिनाजी डुंबरे,रमेश गहिनाजी डुंबरे,पोपट गहिनाजी डुंबरे,दत्तात्रय गेनुजी कोल्हे आदीनी वरील पैकी साडे चार आर.क्षेत्र हे कोल्हे यांना बेकायदा विक्री केले आहे.व त्यात त्यांनी घर बांधले असून त्यात जाण्यासाठी बेकायदा रस्ता करण्यासाठी जे.सी.बी.यंत्र आणून नळी टाकण्याचा प्रयत्न केला.त्या नंतर सुलोचना निमसे व त्यांच्या मुलांनी न्यायालयात रीतसर (रे.मु.क्रं.१३०/२०२१ ) अन्वये दाद मागितली आहे.व कोल्हे व इतरांवर दावा दाखल केलेला आहे.सदर दाव्याचे कामकाज चालू वर्तमानात सुरु आहे. सदर दाव्यात न्यायालयाने अंतिम कामकाज पूर्ण होईपर्यंत,”कोणत्याही प्रकारे पक्का रस्ता तयार करू नये” असा मनाई हुकूम दिलेला आहे.असे असताना शनिवार दि.१६ ऑक्टोबर रोजी कोल्हे व डुंबरे कुटूंबियांनी आपल्या क्षेत्रात जे.सी.बी.च्या सहाय्याने जमीन उकरून पाईप टाकून आरोपीचे शेतातील पाणी आमच्या शेतात काढण्याचा प्रयत्न केला आहे.त्या वेळी त्याला फिर्यादी महिला सुलोचना निमसे व त्यांच्या मुलांनी त्यास हरकत घेतली.व “या रस्त्याला न्यायालयातून स्थगिती आली आहे,तूम्ही तेथे रस्ता खोदु नका” असे स्पष्ट बजावले.त्याचा आरोपींना राग आला व त्यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (क्रं.६६२/२०२१) दि.१६ ऑक्टोबर रोजी दाखल झाला असून त्यात पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.मात्र यात पोलिसांनी कलम १२४ प्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना तो राजकीय दबावातून टाळण्यात आला असल्याचा आरोप विधवा फिर्यादी महिला सुलोचना निमसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.व आरोपी विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे.