जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अतिवृष्टी नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन-इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२२-२०२३ ची रक्कम २५ जुलैपर्यंत जमा न केल्यास ३१ जुलै पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा कोपरगाव तालुका कृती समितीच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना देण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या २५ जुलै २०२३ पर्यंत जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यात वर्ग न केल्यास दि.३१ जुलै पासून कोपरगाव तहसील कार्यालयाबाहेर कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीनुकसान भरपाई प्रत्यक्ष्यात मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा कोपरगावचे तहसीलदार भोसले यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात साल २०२२ ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन,मका,ऊस,कांदा तसेच कपाशी व इतर सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते.त्या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने दिनांक १० ऑगष्ट२०२२ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून नुकसान भरपाई मिळावी यासाठी निर्णय घेतला होता व पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते.त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने दि.०८ सप्टेंबर २०२२ रोजी निर्णय घेण्यात आला व प्रसारित करण्यात आला (सी.एल.एस.-२०२२/प्र.क्र.२९७/म-३) नुसार एस.डी.आर.एफ.नुसार देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या निकषामध्ये बदल करून त्यात वाढ करण्यात आली होती.त्यामुळे सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा निर्माण झाली होती.सध्या खरिपाच्या पेरण्यांनी वेग पकडलेला असून व शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बियाणे व खते इत्यादी घेण्यासाठी चिंतेत असून वरील प्रमाणे राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्यास त्यास खरीप हंगामासाठी बियाणे व खते घेण्यास आर्थिक मदत होणार आहे.

येत्या २५ जुलै २०२३ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यात वर्ग न केल्यास दि.३१ जुलै पासून कोपरगाव तहसील कार्यालयाबाहेर कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीनुकसान भरपाई प्रत्यक्ष्यात मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा कोपरगावचे तहसीलदार भोसले यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष पद्माकांत कुदळे,शिवसेना (उ.बा.ठा.) तिरोडा संपर्कप्रमुख प्रवीण शिंदे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सरचिटणीस नितीन शिंदे,किसान कॉंग्रेसचे जाधव,शेतकरी तुषार विद्वांस तसेच कोपरगाव बिग बागायतदार सोसायटीचे सदाशिव रासकर,अनिल शेवते,नरेंद्र गिरमे,हेमंत गिरमे,कैलास देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.तहसील प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार यांनी निवेदनाचा स्विकार केला असल्याची समितीचे प्रवीण शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीस माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close