जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात घरगुती गॅसचा स्फोट,महिलेसह तिघे जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत कासली फाट्या नजीक असलेल्या गॅस गोदामानजीक असलेल्या छोट्या घरात रहात असलेल्या कुटुंबातील मुलाकडून परवा रात्री च्या सुमारास स्वैपाक घरातील गॅस चालू राहिल्याने व संपूर्ण घरात गॅस पसरला व त्यानंतर सदर घरातील महिलेने गॅस सुरू करण्याचा प्रयत्न केला असता मोठा स्फोट झाला आहे त्यात संबंधित महिला रंजना सोमनाथ कवडे रा.संवत्सर व या महिलेचा पती सोमनाथ कवडे,एक लहान मुलगी असे तिघे जखमी झाले आहे.या मुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र

दि.०८ ऑक्टोबरच्या रात्री साधारण नऊ वाजणेचे सुमारास सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख सोमनाथ कवडे व त्यांची पत्नी रंजना कवडे हे काही कामासाठी बाहेर गेले असता घरातील लहान मुलीकडून गॅसची कळ चालू राहिली.त्यातून गॅस घरभर पसरला गेलेला होता.त्यातून ही दुर्दैवी घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात संवत्सर शिवारात एच.पी.कंपनीची बाबासाहेब परजणे यांचे मालकीची गोपाल कृष्ण गॅस एजन्सी आहे.सदर गॅस कंपनीचे गोडाऊन गावचे उत्तरेस साधारण एक कि.मी.अंतरावर कासली रस्त्यालगत आहे.सदर गॅस कंपनीचे राखण करण्यासाठी सोमनाथ कवडे या इसमाची नेमणूक कारण्यात आलेली आहे.त्यांच्या घरात पती पत्नी व दोन लहान मुली (वय ६ व ८वर्ष) असा परिवार आहे.असून परवा दि.०८ ऑक्टोबरच्या रात्री साधारण नऊ वाजणेचे सुमारास सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख सोमनाथ कवडे व त्यांची पत्नी रंजना कवडे हे काही कामासाठी बाहेर गेले असता घरातील लहान मुलीकडून गॅसची कळ चालू राहिली.त्यातून गॅस घरभर पसरला गेलेला होता.दरम्यान काही वेळाने सदर ठिकाणी घरात आई व वडील घरी आले असता स्वैपाकाचे निमित्ताने संबंधित महिलेने गॅस सुरू केला असता घरातील स्वैपाक खोलीत कोंदटलेल्या गॅसचा भडका होऊन त्याचा मोठा स्फोट झाला. त्यात महिला रंजना कवडे ही महिला साठ टक्के तर सोमनाथ कवडे हे दहा टक्के तर संबंधित एक मूलगी असे अल्पशे भाजले गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

त्यांना नजीकच्या ग्रामस्थांनी उपचारार्थ लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असल्याची माहिती प्राप्त झाली असून महिलेची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close