जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दोन गटात हाणामारी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या वायव्येस साधारण दीड कि.मी.अंतरावर असलेल्या कर्मवीर नगर येथील साई मंदिराजवळ काल रात्री ८.२९ वाजेच्या सुमारास दोन गटात अज्ञात कारणावरून हाणामारी सुरु असल्याची गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी याठिकाणी धाव घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणले असून आरोपी फारूक मुनिर बेग (वय६०),रईस फारूक बेग,राजेंद्र लक्ष्मण राऊत सर्व रा.कर्मवीर नगर या सर्वा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तथापि एकाही आरोपीस अटक केली नाही.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या खबरी नुसार राजेंद्र राऊत याने आपल्या घराचे पावसाचे पाणी एका पाईपच्या सहाय्याने हे नजीकच्या जागेवर काढून दिल्याबाबाबत शेजारी राहणारे फारूक बेग यांनी त्यास हरकत घेतली व त्यांनीच राऊत यांचेवर काठीने हल्ला चढवला व त्यात त्यांचा तोल जाऊन ते नजीकच्या पलंगावर पडल्याने जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात वर्तमानात पावसाने थैमान घातले असून काळ भर पावसात कर्मवीर नगर या उपनगरात दोन गटात अज्ञात कारणावरून हाणामारी सुरु होती.त्या बाबत काही नागरिकांनी या घटनेची खबर कोपरगाव शहर पोलिसांना दिली होती.त्या नुसार कोपरगाव शहर पोलीस तातडीने सदर ठिकाणी धावून गेले असता दोन गटात एकमेकाला मारहाण सुरु असलेली त्यांना दिसून आली व मिळालेली बातमी खरी निघाली असल्याचे सिद्ध झाले.त्यांनी तातडीने दोन्ही गटांना काबूत आणले व त्याना पोलिसी हिसका दाखवला आहे.व त्यांच्या विरुद्ध आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.

त्यात आरोपी फारूक मुनिर बेग (वय६०),रईस फारूक बेग,राजेंद्र लक्ष्मण राऊत सर्व रा.कर्मवीर नगर या सर्वा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तथापि एकाही आरोपीस अटक केली नाही.पोलीस आल्यावर बरेच जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे.

या हाणामारीत आरोपी फारूक बेग व रईस बेग हे दोघे जखमी झाले आहे.कोपरगाव शहर पोलिसानी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र,क्रं.२९७/२०२१ भा.द.वि.कलम १६०,१८८,२६९,२७० प्रमाणे गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close