गुन्हे विषयक
कोपरगावात खोदाई काम कमी दराने घेतले,लोखंडी गजाने मारहाण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या उत्तरेस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या साईसीटी कडे जाणाऱ्या चौकात आपण जेसीबीने बंगल्याच्या खोदाई करण्याचे काम कमी दराने घेतले याचा राग येऊन आपल्याला कोकमठाण (कांचननगर) येथील आरोपी सागर बाळासाहेब लोंढे व आकाश बाळासाहेब लोंढे यांनी लोखंडी गजाने हातावर व पायाचे दोन्ही नडघीवर मारून गंभीर रित्या जखमी केल्याचा गुन्हा फिर्यादी राहुल एकनाथ बोरकर (वय-३४) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी राहुल बोरकर याने ‘जे’ काम घेतले ‘त्या’ कामाची आधी विचारणा बंगल्याच्या मालकाने आरोपीकडे केली होती.मात्र त्यांचा सौदा जमला नव्हता.मात्र तेच काम यांच्यात योग्य ती आर्थिक तडजोड होऊन ते काम फिर्यादी बोरकर यास मिळाले होते.याचा फिर्यादीचाच गावातील आरोपी सागर लोंढे यास राग आला व त्यांनी तो राग फिर्यादी राहुल बोरकर यांचेवर गजाने मारहाण करून काढला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राहुल बोरकर व आरोपी सागर लोंढे हे एकाच गावचे असून त्यांचा जेसीबी यंत्राने माती काम करण्याचा व्यवसाय आहे.वर्तमानात पावसाने थैमान मांडल्याने मोठी कामे जेसीबी व तत्सम यंत्रणा मिळणे अवघड झाले आहे.त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्यात आहे ती थोडी बहुत कामे घेण्यावरून चढाओढ सुरु आहे.त्यातून तंटेबखेडे उभे राहात असून संघर्ष होताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात नगर-मनमाड मार्गावरील साईसीटी कडे वळणाऱ्या रस्त्याच्या चौकात दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
यातील फिर्यादी राहुल बोरकर याने आपल्या जेसीबी यंत्रांसाठी ‘जे’ काम घेतले होते ‘त्या’ इसमाशी या कामाच्या खोदाईचा सौद्याबाबत विचारणा आरोपीशी केली होती.मात्र त्यांचा सौदा जमला नव्हता.दरम्यान सदरच्या कामाची विचारणा फिर्यादिस त्याच बंगल्याच्या मालकाने केली असता त्यांच्यात योग्य ती आर्थिक तडजोड होऊन ते काम फिर्यादी राहुल बोरकर यास मिळाले होते.याचा फिर्यादीचाच गावातील आरोपी सागर लोंढे यास राग आला व त्याने व त्याचा भाऊ यांना राग आला त्यांनी तो राग फिर्यादी राहुल बोरकर यांचेवर काढला आहे.त्याने वरील तारखेस व वेळी वरील ठिकाणी आपल्या दुचाकीवरून येऊन फिर्यादिस गाठले व त्यास,”तू माझे खोदाईचे काम कमी दरात का घेतले” असा जाबसाल करून त्यास शिवीगाळ करून लोखंडी गजाने उजव्या हातावर व दोन्ही पायाचे नडघीवर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी राहुल बोरकर याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक व पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे यांनी भेट दिली आहे.दरम्यान या घटनेतील आरोपी या हल्ल्यानंतर फरार झाले आहे.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.तर या घटनेतील फिर्यादी हा कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२९५/२०२१ भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.