गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात चाळीस हजारांच्या बकऱ्यांची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेस साधारण सात कि. मी.अंतरावर असलेल्या धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी महिला संगीता रवींद्र लकारे (वय-४२) यांच्या घरासमोर दोरीच्या सहाय्याने बांधलेल्या पांढऱ्या व तांबड्या रंगाच्या पाच शेळ्या अज्ञात चोरट्याने अज्ञात वाहनाच्या सहाय्याने चोरून नेल्या असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सम्बधित महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिला व तिचे कुटुंब दि.०४ सप्टेंबर रोजी रात्री ०९.३० वाजे नंतर त्या आपले नियत कर्म आटोपून झोपी गेले असता.रात्री कधीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर बांधून ठेवलेल्या सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या पाच शेळ्या अज्ञात चोरट्याने आपल्या फायद्यासाठी मालकाच्या संमती शिवाय पळवून नेल्या आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि धारणगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून तेथे तिचे पतीसह सर्व कुटुंब राहते.त्या मजुरीने काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात.या खेरीज शेळी पालनाचा व्यवसाय करून त्याचा त्यांना हातभार लागतो.दि.०४ सप्टेंबर रोजी रात्री ०९.३० वाजे नंतर त्या आपले नियम कर्म आटोपून झोपी गेले असता.रात्री कधीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोर बांधून ठेवलेल्या सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या पाच शेळ्या अज्ञात चोरट्याने आपल्या फायद्यासाठी मालकाच्या संमती शिवाय पळवून नेल्या आहेत.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा र.क्रं.३२३/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.