गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी पळवली,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत मोतीनगर हद्दीतून सोमवार दि.०९ ऑगष्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जामखेड मिलिंदनगर येथील आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळविले असल्याची फिर्याद या मुलीच्या ४२ वर्षीय मातेने कोपरंगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून,फूस लावून पळवून नेण्याच्या महिन्याला किमान चार ते पाच घटना कोपरगाव तालुक्यात घडत आहेत.विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी म्हणणे आहे.
चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून,फूस लावून पळवून नेण्याच्या घटना तालुक्यात किमान चार ते पाच घटना कोपरगाव तालुक्यात घडत आहेत.विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचयातील किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाअधिक असल्याचे पोलिसांनी म्हणणे आहे.खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत.कोपरगाव तालुक्यात या अल्पवयीन मुली पळविण्याचे प्रमाण अलिकडे काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.अशीच घटना सुरेगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी या महिलेची फिर्याद दाखल करून घेतली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.२९९/२०२१ भा.द.वि.कलम ३६३ दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.सतीश भताने हे करीत आहेत.