जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पर्सवर चोरट्याने मारला डल्ला,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नगर-मनमाड राज्य मार्गावर असलेल्या हॉटेल शीतल समोर आपली दुचाकी उभी करून त्यावर भ्रमणध्वनिसह रोख रकमेची पर्स ठेवून आपले इतरत्र काही काम करत असताना अज्ञात चोरट्याने त्या पर्सवर डल्ला मारल्याची घटना घडली असून त्यातील १५ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा एम.आय,-१० मॉडेलचा काळ्या रंगाचा भ्रमणध्वनी संच,०५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलक्सि ए.-२ कोअर मॉडेलचा भ्रमणध्वनी संच,व ०५ हजार रुपये रोख असा २५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला असल्याची फिर्याद लारा दत्तात्रय तिपाले (वय-३५) यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला या आपल्या काही कामासाठी हॉटेल शीतल समोर उभ्या असताना त्यांची नजर चुकवून एका अज्ञात चोरट्याने हा डल्ला मारला आहे.त्यात १५ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा व अन्य एक असे दोन भ्रमणध्वनी व रोख रुपये पाच हजार असा २५ हजारांचा अवैज लंपास केला आहे.

कोपरगाव शहरात वर्तमानात भुरट्या चोरांनी आपले डोके पुन्हा वर काढल्याचे दिसून येत असून पोलिसांना वाकुल्या दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात नगर-मनमाड मार्गावर हॉटेल शीतल समोर दि.०७ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.फिर्यादी आपल्या काही कामासाठी हॉटेल शीतल समोर उभ्या असताना त्यांची नजर चुकवून चोरट्याने हा डल्ला मारला आहे.त्यात १५ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा एम.आय,-१० मॉडेलचा काळ्या रंगाचा भ्रमण ध्वनी संच,०५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा गॅलक्सि ए.-२ कोअर मॉडेलचा भ्रमण ध्वनी संच,व ०५ हजार रुपये रोख असा २५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.फिर्यादी महिला जेंव्हा आपल्या दुचाकींजवळ आल्या तेंव्हा त्यांना आपली चोरी झाल्याचे समजून चुकले त्यांनी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२७६/२०२१ भा.द.वि.३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस.आर.शेवाळे हे करीत आहेत.दरम्यान महिलांनी आपले दागिने व वस्तू सांभाळून ठेवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक देसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close