गुन्हे विषयक
कोपरगावातील ‘त्या’ आरोपींना विशेष दर्जा,कारागृहा ऐवजी दवाखान्यात बडदास्त!
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगर परिषदेत काल दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील पूनम चित्रपट गृहासमोरील आरोपींचे अवैध टपरीचे अतिक्रमण रात्रीच्या सुमारास नगरपरिषदेने काढल्याचा राग मनांत धरून अधिकाऱ्यांना मारहाण करून मोठी तोडफोड करणाऱ्या दोन प्रमुख आरोपींची वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कृपेने राजकीय अभय मिळून त्यांची दवाखान्याच्या नावाखाली मोठी बडदास्त ठेवल्याची विश्वसनीय माहिती हाती आल्याने अनेकांचे डोके चक्रावले आहे.
काल कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता दोन दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.दरम्यान या सात आरोपीतील एक माजी पदाधिकारी तर दुसरा सेनेचा जिल्हा पदाधिकारी अशा दोन प्रमुख आरोपींना राजकीय अभय मिळून दवाखान्याच्या नावाखाली विशेष सवलत देऊन त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती दाखवले असून तेथें त्यांची विशेष बडदास्त ठेवली जात असल्याची गंभीर दखल अधिकारी महासंघाने घेतल्याचे बोलले जात आहे.या आधीच अधिकारी संघाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन सुरू केले त्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण कोणते वळण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे?
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव नगरपरिषदेने आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे आदेशाने मार्च २०१० मध्ये शहरातील सुमारे २ हजाराहून अधिक अवैध व्यावसायिकांची अतिक्रमणे हटवली होती.त्यानंतर गत दहा वर्षाहून अधिक काळ या प्रश्नावर विविध पक्षांचे शहरातील मतपेटीचे राजकारण सुरु आहे.ते अद्याप संपण्याची चिन्हे नाही.वर्तमानात अशाच घटना घडत असून अधिकाऱ्यांनी पोलीस बल घेऊन अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून अतिक्रमण काढणाऱ्या अधिकाऱ्यांनाच लक्ष केले आहे.ही घटना दि.२२ जुलै २०२१ रोजी घडली असून कोपरगाव नगरपरिषदेने पूनम चित्रपट गृहासमोरील अतिक्रमण काढलेले असताना त्याच ठिकाणी वरील काही आरोपीनी पुन्हा त्याच ठिकाणी आपले दुकान मांडण्याचा प्रयत्न केला असता.त्याला नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरकत घेतली व त्या विरोधात कारवाई करून ते अतिक्रमण रात्रीच्या सुमारास मुख्याधिकारी डोईफोडे यांच्या आदेशाने काढून टाकले होते.त्याचा राग मनात धरून शिवनेनेचे माजी शहराध्यक्ष सनी वाघ,माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक योगेश बागुल,उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव,बालाजी गोर्डे,साई पंढरीनाथ गोर्डे,निलेश गोर्डे,आशिष शेळके आदीनीं बेकायदा जमाव करून नगरपरिषदेत सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जाऊन तेथील उपमुख्याधिकारी व शहर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ यांच्या दालनात जाऊन शिवीगाळ तर काहींना मारहाण केली तर तेथील किंमती साहित्याची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली होती.
या प्रकरणी फिर्यादी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी या प्रकरणी वरील सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या आरोपींना प्रथम कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती.त्यानंतर काल कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता दोन दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.दरम्यान या सात आरोपीतील एक माजी पदाधिकारी तर दुसरा सेनेचा जिल्हा पदाधिकारी अशा दोन प्रमुख आरोपींना राजकीय अभय मिळून दवाखान्याच्या नावाखाली विशेष सवलत देऊन त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती दाखवले असून तेथें त्यांची विशेष बडदास्त ठेवली जात असल्याची विश्वसनीय व खळबळजनक माहिती हाती आली आहे.त्यामुळे प्रशासन हितेशी अधिकाऱ्यात चुकीचा संदेश जाणार असून आगामी काळात कोणीही कर्तव्यदक्ष अधिकारी कोपरगावात येण्यास धजावणार नाही.त्यासाठी राजकीय नेत्यांनी या गंभीर व चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालताना विचार करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांना मारहाण करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात ही बडदास्त कोणाच्या अभयाने ठेवली असा सवाल निर्माण झाला आहे.व ते खरेच गंभीर आजाराने त्रस्त आहे का ?असे असेल तर न्यायालयात हजर करताना त्यांच्या समर्थकांनी व पोलीस प्रशासनाने त्यांना सुस्थितीत पाहिले आहे.त्यामुळे यामागे कोण कार्यरत आहे असा सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे समजते.याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.