जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील ‘त्या’गुंह्यातील पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायिक कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील तीळवणी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली महिला सोनाली धनंजय गायके (वय-२४) हिने दि.१४ जुलै रोजी आपल्या घरी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणी फिर्यादी व मयत महिलेचे पिताश्री दादासाहेब हरिभाऊ खटकाळे (वय-५२) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हुंडाबळीतून आत्महत्या करण्यास भाग पाडल्या प्रकरणी त्याच दिवशी उशिरा गुन्हा दाखल केला होता.त्यातील आरोपी नवरा धनंजय भाऊसाहेब गायके,सासरा भाऊसाहेब भागाजी गायके,सासू लिलाबाई भाऊसाहेब गायके,दीर सागर भाऊसाहेब गायके,मनोज भाऊसाहेब गायके आदी पाच आरोपीना कोपरगाव तालुका पोलिसानी अटक करून आज कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना चौदा दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान आज अटक केलेल्या पाचही आरोपींना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजू एकूण घेऊन न्यायालयाने पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नीं.सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सोनाली धनंजय गायके (वय-२४) या महिलेने आपल्या घरात दि.१४ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यामुळे तीळवणी परिसरात खळबळ उडाली होती.या प्रकरणी शवविच्छेदन केल्यानंतर मयत महिलेचे वडील दादासाहेब हरिभाऊ खटकाळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्याच रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.त्यात आरोपी म्हणून मयत महिलेचा नवरा धनंजय भाऊसाहेब गायके,सासरा भाऊसाहेब भागाजी गायके,सासू लिलाबाई भाऊसाहेब गायके,दीर सागर भाऊसाहेब गायके,मनोज भाऊसाहेब गायके सर्व रा.तीळवणी यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ४९८(अ),३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.त्यात मयत महिलेच्या वडिलांच्या वडिलांनी आपल्या फिर्यादीत म्हटले होते की,”माझी मुलगी नामे सोनाली हिचे लग्नानंतर सहा महिन्यांनी ते आजपावेतो यातील आरोपी मजकूर यांनी यातील मयत हीच वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून तिला माहेरून पैसे घेऊन ये” अशी मागणी करून यातील मयत हिस वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला यातील आरोपी मजकूर यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे म्हटले होते.त्या प्रकरणी मयत महिलेच्या पित्याच्या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान आज अटक केलेल्या पाचही आरोपींना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजू एकूण घेऊन न्यायालयाने पाच आरोपींना चौदा दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नीं.सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close