जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शिर्डीतील ‘तो’खून सुपारी देऊन केला,चार आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

साकुरी- (किशोर पाटणी)

शिर्डी शहरातील बहुचर्चित २९ जून रोजी झालेल्या राजू आंतवन धिवर (वय-४२) यांच्या खुनात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शिर्डी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे,उपविभागीय अधिकारी संजय सातव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,प्रवीण लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिर्डीत २९ जून रोजी झालेल्या खुणाने खळबळ उडाली होती मात्र नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी या खुनाच्या प्रकरणात नाशिक पोलिसांची मदत घेऊन राजु उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे, (वय-१९) रा पाथर्डी रा.नाशिक,अविनाश प्रल्हाद सावंत,(वय-१९),पाथर्डी रा.नाशिक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर मयत धिवर यांचा खून चार लाख रुपये सुपारी देऊन आरोपी अमोल सालोमन लोंढे (वय-३२) रा. शिर्डी,अरविंद महादेव सोनवणे (वय-१९) रा. शिर्डी या आरोपींना उघड केले आहे.

यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील म्हणाले की”तांत्रिक पुराव्याच्या आधारे ४० चलचित्रणाच्या सहाय्याने या खूनाचा तपास सुरू करण्यात आला होता.या खुनाचा तपास नाशिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात आला.शिर्डी पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणात नाशिक पोलिसांची मदत घेऊन राजु उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे, (वय-१९) रा पाथर्डी रा.नाशिक,अविनाश प्रल्हाद सावंत,(वय-१९),पाथर्डी रा.नाशिक यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर मयत धिवर यांचा खून चार लाख रुपये सुपारी देऊन आरोपी अमोल सालोमन लोंढे (वय-३२) रा. शिर्डी,अरविंद महादेव सोनवणे (वय-१९) रा. शिर्डी यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचे सांगितले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”पोलीस तपासात सदरचा गुन्हा हसीम खान नालासोपारा ठाणे,कुलदीप पंडित राहणार नाशिक,साहिल शेख राहणार नाशिक,साहिल पठाण रा.नाशिक,यांनी केल्याचे सांगितले असून या प्रकरणात या चारही जणांचा शोध सुरू आहे.या खुनाचे आणखी काही कारण आहे का ? या बाबत देखील शिर्डी पोलिस प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.व लवकरच या सर्व खुनाचा उलगडा सविस्तरपणे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बांधकाम मंजूर राजेंद्र धिवर याचा खून झाल्यानंतर शिर्डी शहरात मोठी खळबळ उडाली होती.हा खुनाचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावा यासाठी देखील त्याच्या मयताच्या कुटुंबीयांचा मोठा पाठपुरावा सुरू होता.या खुनाचा लवकरात लवकर तपास लागला पाहिजे यासाठी नातेवाईकांचा देखील मोठा पाठपुरावा सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर गत दहा दिवस शिर्डी पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिर्डी पोलिसांचे पथक नाशिक पोलिसांची मदत घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पाठपुरावा करीत होते.काल चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कठोर चौकशी शिर्डी पोलिसांनी सुरू केली आहे.चार पैकी दोन जणावर त्यातील राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व अविनाश प्रल्हाद सावंत राहणार नाशिक या दोघांच्या विरोधात नाशिक इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये खुनासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स.पो.निरीक्षक सोमनाथ दिवटे,दीपक गंधाले,प्रवीण दातरे,बारकू जाणे,सुरेखा देवरे,वैभव रुपवते,पोलीस कर्मचारी गणेश इंगळे,दत्तात्रय हिंगडे,दत्तात्रय गव्हाणे,मनोहर गोसावी,सुनील चव्हाण,विशाल दळवी,शंकर चौधरी,रवी सोनटक्के,दीपक शिंदे,सचिन अडबल,रवींद्र घुंगासे,संदीप चव्हाण,संदिप दरंदले,रोहित येमुल,सागर ससाणे,रणजीत जाधव,प्रकाश वाघ,राहुल सोळुंके,मेघराज कोल्हे,उमाकांत गावडे,अर्जुन बडे,भरत बुधवंत,सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकाची स्थापना करून हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केला होता.पोलिसांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close