गुन्हे विषयक
आंदोलन प्रश्नी आ.राजळेंवर गुन्हा तर माजी आ.कोल्हें विरुद्ध का नाही-नगराध्यक्ष वहाडणेंचा सवाल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या साठी राज्य कोपरगाव येथील भाजपने माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर रस्ता अडवून चक्काजाम आंदोलन केले त्यामुळे अनेक अवजड वाहनांची व प्रवाशांची दोन तासाहून अधिक काळ कोंडी झाली त्याबाबत कोपरगाव जिल्हा पोलिसानी आ.राजळेंवर गुन्हा दाखल केला मग कोपरगावातील आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले नाही ? असा रास्त सवाल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केल्याने पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांना आपले काम काय आहे याची जाणीव असून ते चोखपणे बजावत असून त्याच दिवशी पोलिसांनी प्रमुख आरोपींसह ४८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या आरोपांची हवा गुल झाली आहे.दरम्यान वाहाडणे यांनी मग पोलिसानी हि घटना माध्यमांसमोर उघड का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे.
कोपरगाव नगरपरिषेची निवडणूक आगामी नोव्हेम्बर महिन्यात येऊन ठेपली आहे.या पार्श्वभूमीवर आगामी काळात निळवंडे या विषयावर पुन्हा एकदा कोपरगावात निवडणुकीचा आखाडा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.भाजपच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात आले असून कोपरगाव येथे नगर-मनमाड मार्गावर साईबाबा चौफुलीवर कोपरगाव तालुका भाजपच्या वतीने माजी आ.स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी चक्का जाम आयोजित केले होते.त्यात ओ.बी.सी.चे आरक्षण या विषयावर “चक्काजाम”आंदोलन आयोजित केले असतांना माजी आ.कोल्हे व त्यांचे युवराज विवेक कोल्हे यांनी निळवंडेच्या बंदिस्त जलवाहिनींच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेल्या विषयावर टीका टिपणी करून हे आंदोलन भरकटवले होते.त्यावर आमच्या प्रतिनिधीने पोलिसांनी या प्रकरणी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले होते.त्या नंतर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वाहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यामुळे याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”ओ. बी.सीं.ना राजकिय आरक्षण मिळावे यासाठी भाजपाने महाराष्ट्रभर रस्ता रोको,चक्का जाम अशा स्वरूपाची आंदोलने केली.अनेक ठिकाणी आंदोलक व आंदोलक नेत्यांवर गुन्हे दाखल झाले,अनेक नेत्यांना अटकही झाली.कोपरगाव साईबाबा चौफुली येथे झालेल्या रस्ता रोकोमुळे नगर मनमाड हायवे ०३ तास ठप्प झाला,वाहने अडकून पडले,प्रवाशांचे हाल झाले.अनेक अवजड वाहने गोदावरीच्या लहान पुलावरुन शहरातून वळविली,त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला.कोविड मुळे १४४ कलम लागू असतांनाही शेकडोंचा जमाव जमवून अनेकांनी विषय सोडून भाषणे ठोकण्याची भूक भागवून घेतली.जमावबंदीचा भंग केला म्हणून संबंधितांवर गुन्हे का दाखल केले नाहीत? त्यावेळी कोपरगावचे तहसीलदार,पोलीस निरीक्षकही उपस्थित होते,त्यांनी कारवाई का केली नाही?आपल्याच जिल्ह्यात त्याचवेळी आंदोलन करणाऱ्या आ.मोनिका राजळे यांच्यावर कारवाई झाली.पण कोपरगावचे प्रशासन कोल्हे यांच्या दबावाखाली काम करते कि काय? सामान्य जनतेवर कायद्याचा बडगा उगारणारे अधिकारी कारवाई करायला का घाबरले ? अशामुळे स्वतःच्या मस्तीत राजकारण करणारे जास्तच उंडारतील,प्रशासनाचाही नैतिक अधिकार कमी होतो हे लक्षात घ्या.अजूनही वेळ गेलेली नाही,संबंधीत नेते व जमाव यांच्यावर कारवाई करा.अन्यथा यानंतर मलाही वेगळ्या मार्गाने जावे लागेल.आम्ही प्रशासनाला सहकार्य करायचे व काहींनी कायदे धाब्यावर बसवून कोरोनाचा धोका असूनही मनमानी करायची हे योग्य नाही.नेत्यांनी बडेजाव स्वतःच्या घरी दाखवावा,सामान्य जनतेच्या जीवित धोक्याचे आणू नये असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.