गुन्हे विषयक
पत्नीने केला भावाच्या मदतीने पतीचा खुन,पंधरा दिवसाने रहस्य उघड
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या महिलेने आपल्या पतीचा आपल्या भावाच्या मदतीने विजेच्या शॉक देऊन व नंतर चार पदरी दोरीने गळा आवळून आपलाच पती शिवनारायन नानाभाऊ संवत्सरकर याचा खून केल्याची घटना मयताच्या पित्याने संशय व्यक्त केल्याने उघड झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत आरोपी पत्नी जयश्री शिवणारायन संवत्सरकर व तीचा हर्सूल कारागृहातील भाऊ किरण कैलास ढोणे यांना कोपरगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मयत हा आपल्या पत्नीला दारू पिऊन त्रास देत होता.या त्रासातून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले होते.व दि.०६ जूनच्या रात्री आरोपी बहीण भावांनी मयतास आधी शॉक देऊन जखमी केले व तो त्यात मरण पावला नसल्याने चार पदरी दोरीच्या सहयायाने त्यास फाशी देऊन मारून टाकले असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलीस तपासात या बाबी उघड झाल्याने आरोपी जेरबंद केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,आरोपी महिला जयश्री संवत्सरकर व मयत पती शिवनारायन यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून बेबनाव होता.मयत हा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता.त्यामुळे आरोपी पत्नी त्रस्त झाली होती.त्यामुळे तिने आधी याबाबत अनेक वेळा पतीला समजावून सांगितले होते.मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता.अखेर तिने या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी आपल्या हर्सूल येथील कारागृहात सेवेत असलेल्या भावाला बोलावून घेतले होते.व आधी आपल्या भावाच्या हि बाब आणून दिली होती.त्यातून हे कट कारस्थान शिजले होते.दरम्यान अशी संधी त्यांना रविवार दि.६ जून रोजी प्राप्त झाली होती.त्यांनी रात्रीच्या सुमारास आपल्या पतिला आधी केबलच्या सहाय्याने विजेच्या शॉक दिला त्या शॉक ने काही अंशी मृच्छित झाल्यावर त्याचा जीव गेलेला नाही हि जाणीव झाल्यावर त्याला चार पदरी दोरीच्या साहाय्याने गळफास दिला होता.व कोपरगाव शहर पोलिसांची दिशाभुल करण्यासाठी दारूच्या नशेत मयताने विजेच्या शॉक घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी त्यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.२९/२०२१ दाखल केली होती.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपास कामी चौकशी अंमलदार पोलीस नाईक दारकुंडे यांनी जाबजबाब सुरु केले असता वडिलांचा जबाब नोंदवला असता त्यानीं या कामी संशय व्यक्त केला होता.त्यांच्या व आरोपींचा जबाबात सिसंगती दिसून आली होती.हा धागा पकडून पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी बारीक अभ्यास केला असता या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नाही.त्यांनी या प्रकरणाचा बारीक अभ्यास केला असता त्यात त्यांनी कसून तपास केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.तपासात मयत हा आपल्या पत्नीला दारू पिऊन त्रास देत होता.या त्रासातून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले होते.व दि.०६ जूनच्या रात्री आरोपी बहीण भावांनी मयतास आधी शॉक देऊन जखमी केले व तो त्यात मरण पावला नसल्याने चार पदरी दोरीच्या सहयायाने त्यास फाशी देऊन मारून टाकले असल्याचे निष्पन्न झाले आहे.यात मयताच्या बापाचा मयताचा खून हा मयताची पत्नी व तिचा भाऊ यांनीच केला असल्याचा जबाब महत्वपूर्ण ठरला आहे.त्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गणबोटे यांनी दि.२२ जून रोजी दिलेल्या आपल्या अहवालात मयताचा मृत्यू हा गळा आवळून झाला असल्याचा अभिप्राय दिला होता.तो या प्रकरणात महत्वाचा ठरला होता.याबाबत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९२/२०२१भा.द.वि.कलम ३०२,२०१,२०३,१२०,(ब),३४ प्रमाणे आरोपी पत्नी व तिचा भाऊ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिसनिरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.