गुन्हे विषयक
कोपरगाव नजीक डिझलचा टँकर उलटला,दुचाकीस्वारासह दोन ठार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील दशरथवाडी नजीक रेल्वे पुलाजवळ आज दुपारी एक वाजेच्या सुमारास कोपरगाव कडून वैजापूर कडे वेगाने जाणाऱ्या डीझल टँकरने (क्रं. एम.एच.४६ बी.बी.३०६६) दहिगाव बोलका येथील बाळासाहेब वलटे यांच्या दुचाकीला धडक देऊन उलटलेल्या डीझलच्या टँकर खाली त्याचा चालक व दुचाकीस्वार असे दोघे जागेवर ठार झाले असून असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस मिळाली आहे त्याला पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.
कोपरंगावकडून वैजापूरच्या दिशेने वेगाने जात असलेला डिझलचा टँकर दशरथ वाडी नजीक उलटून त्यात ट्रक चालक हा जागीच ठार झाला असून दहिगाव बोलका येथील बाळासाहेब वलटे हे रहिवाशी यांना टँकरची धडक बसून गंभीर जखमी झाले होते.त्यांना आधी कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचे निधन झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील दशरथवाडी नजीक हॉटेल द्वारकांमाई जवळ आज एक वाजेच्या सुमारास वरील क्रमांकाचा डिजल टँकर घेऊन चालक कोपरंगावकडून वैजापूरच्या दिशेने वेगाने जात असताना नजीक असलेल्या दहिगाव बोलका येथील बाळासाहेब वलटे हे रहिवाशी समोरून येत असताना त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वारास धडक बसली त्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून या घटनेत डीझल टँकर रस्त्यावरच उलटला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना घटना समजल्याबरोबर त्यांनी आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे व अग्निशामक पथकास पाचारण केले आहे.व या मुंबई-नागपूर या मार्गावरील वाहतूक बिरोबा चौक मार्गावरून पंतप्रधान सडक रस्त्यावरून वळवली आहे.घटनास्थळी मयत चालकास रुग्णवाहिकेद्वारे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी हलविण्यात आले असून या दुर्घटनेत दहिगाव बोलका येथील दुचाकीस्वार बाळासाहेब वलटे यांना टँकरची धडक बसून गंभीर जखमी झाले होते.त्यांना आधी कोपरगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या नंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचे निधन झाले आहे.त्यामुळे या अपघातात मृत्यू पावणारांची संख्या दोन झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी वाहतूक अल्पावधीत पूर्ववत सुरू होईल व घटनास्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी तालुका पोलीस दक्षता घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.