जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

प्रेमसंबंध उघड करण्याची भीती दाखवून महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नगदवाडी हद्दीतील एक ३८ वर्षीय महिलेशी बळजबरीने प्रेमसंबंध ठेऊन,”तू याची माहिती कोणाला सांगशील तर तुझे प्रेमसंबंध उघड करील” अशी धमकी देऊन सोबत राहण्यासाठी दमदाटी व वेळोवेळी मारहाण करून तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून महिलेच्या पतीने त्याच गावातील आरोपी गंगाधर गजाराम जावळे याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिसानी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान मयत महिला हि गेले पाच वर्षांपासून आरोपी गंगाधर जावळे याचे शेतात कामास जात होती.त्यातून हे प्रेमसंबंध निर्माण झाले होते.आठ महिन्यांपूर्वी या दोघात काही अज्ञात कारणावरून भांडण झाले होते.त्यातून त्याने विषारी औषध प्राशन केले होते.त्यातून आरोपी कसाबसा वाचला होता.त्या नंतर मयत महिला व आरोपी यांचे आत्महत्या करण्यापूर्वी आदल्या दिवशी कडाक्याचे भांडण झाले होते त्यातून हा प्रकार झाला असावा असा कयास व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादीच्या जवळ असलेल्या राज्य शेती महामंडळाच्या शेतजमिनीत एक दोन क्रमांकाची विहीर असून या विहिरीत दि.१३ मे पूर्वी सीमा बाबासाहेब लांडगे (वय-३८) या महिलेचे शव तरंगताना आढळून आले होते.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१७/२०२१ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.त्या अकस्मात मृत्युची चौकशी करत असताना पोलिसांना या घटनेचा शोध लागला असून फिर्यादीने याबाबत पोलिसांना या घटनेची माहिती दिली असल्याचे उघड झाले आहे.

त्या मयत महिलेच्या पतीने फिर्यादीत म्हटले आहे की,आपली पत्नी हिचे सोबत आरोपी गंगाधर गजाराम जावळे याने बळजबरीने प्रेमसंबंध ठेऊन आपल्या पत्नीस वेळोवेळी,”तू कोणाला काही सांगशील काही तक्रार करशील तर तुझे व माझे लफडे आहे असे सर्व गावात सांगेल”असा दम देऊन आपल्या मयत पत्नीला धमकी देऊन आपल्या घरी येऊन पत्नीस वेळोवेळी मारहाण करून,तू, माझे सोबत राहा,अशी दमदाटी करून आपल्यास व आपल्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी देत असे” या आरोपीच्या त्रासाला कंटाळून मयत पत्नीस आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे अशी फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०२/२०२१ भा.द.वि.कलम ३०६,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी गंगाधर गजाराम जावळे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे एक करीत आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मयत महिला हि गेले पाच वर्षांपासून आरोपी गंगाधर जावळे याचे शेतात कामास जात होती.त्यातून हे प्रेमसंबंध निर्माण झाले होते.आठ महिन्यांपूर्वी या दोघात काही अज्ञात कारणावरून भांडण झाले होते.त्यातून त्याने विषारी औषध प्राशन केले होते.त्यातून आरोपी कसाबसा वाचला होता.त्या नंतर मयत महिला व आरोपी यांचे आत्महत्या करण्यापूर्वी आदल्या दिवशी कडाक्याचे भांडण झाले होते.व घटनेच्या दिवशी मयत महिला हि आरोपीच्या शेतात होती.त्यामुळे या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close