गुन्हे विषयक
राहात्यातील..त्या मंडलाधिकाऱ्याची जामिनावर सुटका
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील मंडलाधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यांनी तक्रारदारकडून आपली खरेदीची नोंद सातबाऱ्यावर लावण्यासाठी सुमारे चार लाखांची लाच मागितली होती त्यातील दोन लाखांची लाच देताना त्यांना रंगेहात पकडल्याच्या घटनेची सुनावणी नूकतीच कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर पार पडली असून त्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे.
राहाता तालुक्यातील पिंपळस येथील तक्रारदार याच्या खरेदी जमिनीची नोंद लावण्यासाठी मंडलाधिकारी जगन्नाथ भालेकर यांनी दि.१९ मे २०२१ रोजी आपल्या राहाता येथील कार्यालयात दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चार लाखांची मागणी केली होती.व तक्रारदार दुखावला जाऊन त्याने नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सापळा लावला होता त्यातून हि दोन लाखांची लाच स्वीकारली होती.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”राहाता तालुक्यातील पिंपळस येथील तक्रारदार याच्या खरेदी जमिनीची नोंद लावण्यासाठी मंडलाधिकारी जगन्नाथ भालेकर यांनी दि.१९ मे २०२१ रोजी आपल्या राहाता येथील कार्यालयात दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास चार लाखांची मागणी केली होती.व तक्रारदार दुखावला जाऊन त्याने नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सापळा लावला होता.त्यातील दोन लाखांची रोख रक्कम मंडलाधिकारी भालेकर यांना ठरलेल्या वेळी व ठिकाणी देण्याचे ठरले होते.त्या नुसार तक्रारदार याने ती रक्कम मंडलाधिकारी यांना दिली होती.त्याच वेळी ठरलेल्या वेळी व ठिकाणी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदाराच्या तक्रारीवरून लावलेल्या सापळ्यात मंडलाधिकारी अलगद अडकले होते.त्या प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.मात्र राहाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी मंडलाधिकारी भालेकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता.त्या विरोधात त्याने कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे अपील केले होते.त्याची सुनावणी नुकतीच पार पडली असून त्यात न्यायदंडाधिअकारी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला त्यात आरोपीचे वकील जयंत जोशी यांनी,” खरेदी व्यवहार जर चार लाखांचा आहे तर त्यासाठी साडेतीन लाखांची भली मोठी रक्कम मंडलाधिकारी यांना कशी देऊ शकतो” असा सवाल उपस्थित केला होता.व याच तक्रारदारांचा एक अर्ज या मंडलाधिकारी यांनी फेटाळला होता.व तो त्यांनी नामंजूर केला होता.त्या प्रकरणी तक्रारदार हा दुखावला जाऊन त्याने हा खोटा खटला दाखल करण्याचे कृत्य केले आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी मंडलाधिकारी जगन्नाथ भालेकर यास जामिनावर मुक्त करण्याचा आदेश केला आहे.व पुढील तपास कमी सहकार्य करण्याचे आदेशित केले आहे.
या खटल्यात आरोपीच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी बाजू मांडली त्यांना अड्.व्यंकटेश ख्रिस्ते,अड्.योगेश दाभाडे यांनी सहकार्य केले आहे.