गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात आता महसूल कर्मचाऱ्यांची वाळूचोरीत ‘भागीदारी’
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात या पूर्वी लोकप्रतिनिधी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असल्याची बाब जुनी झाली असून आता महसूल विभागाचे कर्मचारी आता केवळ हप्त्यापूरतेच उरले नसून ते आता वाळूचोरांना सामील होऊन भागीदारीत उतरले असल्याची धक्कादायक बाब धामोरी परिसरात निष्पन्न झाली आहे.आता त्यात त्यांची नुसती वाळूचोरीचे वाहन सोडून देण्यापूर्तीच भूमिका नसून चक्क भागीदारी असल्यानेच धामोरी येथील ते वाळू चोरीचे वाहन सोडून दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे वाळूचोरीचा प्रवास आता वाळूचोर-पुढारी व आता थेट महसूल कर्मचारी असा सोयीस्कर सुरु असल्याचे उघड झाल्याने आता गोदावरीचे,’रक्षणकर्तेच भक्षणकर्ते’ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.त्यामुळे अनेकांनी डोक्याला हात लावला आहे.
गत महिन्याच्या शेवटी वाळूचोरीत सहभागी असलेल्या ‘त्या’ महसुली कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही हे विशेष ! आता त्यात वाळूचोर व कनिष्ठ महसूल कर्मचारी आता यांचे लागेबांधे आता हप्त्यापुरते मर्यादित राहिलेले नाही ‘ते’ आता भागीदारीपर्यंत पोहचले आहे.हि धक्कादायक पुढील प्रगती वाळूचोरीच्या इतिहासात प्रथमच उघड झाली आहे.त्यामुळे आता,’जसा राजा,तशी प्रजा’ हि जुनी म्हण प्रत्यक्षात येताना दिसत आहे.
वर्तमानात कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचोरी हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे.यातून खून पडु लागले आहेत.तर काही राजकीय पुढारी यास प्रतिबंध करण्या ऐवजी आपल्या तुंबड्या भरून घेत असल्याचे उघड होता आहे.परिणामी हा प्रश्न अजून गंभीर बनला आहे.भोजडे,येथे गतवर्षी या बाबीवरून एकाचा खून झाल्याची घटना ताजी आहे.या पूर्वीही तेरा वर्षांपूर्वी तर कोकमठाण येथे व संवत्सर येथे २०१२ साली यावैध वाळूतून मुडदे पडले आहे.व गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.हि अत्यंत गंभीर बाब असून यातून वाळूचोरांकडे मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे आढळून येत आहेत.त्यातून या घटना वाढीस लागल्या आहेत.या कडे सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न म्हणून पाहणे गरजेचे आहे.यातून गोदावरी खोऱ्यात भूजल पातळी खूप खोलवर गेल्याने शेती क्षेत्राचे ‘न भूतो’ अशी हानीं झाली आहे.महसूल अधिकारी तीन वर्षात बदली होत असल्याने बऱ्याच वेळा जाता-जाता हात धुवून घेत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे.मात्र यावर ज्या राजकीय नेत्यांनी तालुक्याच्या उज्वल कृषी भवितव्यासाठी उत्तर शोधणे गरजेचे असताना वर्तमानात त्यांचे व त्यांच्या युवराजांचेच हात बरबटले असल्याने समस्या गंभीर बनली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील लिलावात येथील माजी राजकीय नेत्यांच्या सुपुत्रांचा हात असल्याची माहिती आता जुनी झाली असून कोपरगाव तालुक्यातही दोन प्रमुख आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रत्येक पक्षाचा प्रमुख यात या वर्षी सामील झाल्याचे उघड झाले आहे.यावरून या प्रकरणाचे गांभीर्य कोणाही सुज्ञ वाचकांच्या ध्यानी येईल.विशेषतः कोपरगाव तालुक्यात या क्षेत्रात नव्या पिढीचे नेते व त्यांची या क्षेत्रातील आघाडी ‘वाखाणण्यासारखी’ असताना आता महसूल विभागही यात कमी नसल्याचे नुकतेच गत महिन्याच्या अखेर दिसून आले होते.त्याचे ताजे उदाहरण म्हणून धामोरी परिसरातील दोन स्थानिक वाळूचोर व महसुली कर्मचाऱ्यांच्या आवाजाच्या काही ध्वनी मुद्रिकांचा प्रसार सामाजिक संकेत स्थळावर चर्चेच्या अग्रस्थानी होत्या.यात शुक्ला नावाचा एक निम्न स्तरीय महसुली कर्मचारी दुसऱ्या समकक्ष कर्मचाऱ्याशी संपर्क साधताना त्याने ‘रवी’ नामक वाळूचोरांचा ट्रॅक्टर पकडल्याबाबत आक्षेप घेताना दिसत असून ‘तो’ आपण ‘सचिन’चा मित्र असल्यानेच आपला ट्रॅक्टर वारंवार चौथ्यांदा पकडला असल्याचा दावा करून एका महसुली कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत होता.व ‘शुक्ला’नामक तलाठी त्या ट्रॅक्टरला सोडण्यास तयार नसल्याचे आधी सांगतो मात्र वाळूचोर त्याला धमकावतो तो पुन्हा ‘शुक्ला’ नावाच्या महसुली कर्मचाऱ्याशी संपर्क साधतो व “तुम्हीच कशाला वाळूचोरांना अंगावर घेता” असा सवाल करून सोडविण्यास सांगतो.त्या प्रमाणे ते दोन्ही महसुली कर्मचारी त्यास तयार होताना दिसले होते.मात्र ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी जो ‘विकास’ नावाचा चालक आणलेला असतो तालुक्याच्या प्रमुख महसुली अधिकाऱ्यांचा विश्वासातील असल्याचे दिसते.तो प्रथम नकार देतो मात्र त्याला हे दोन्ही कनिष्ठ महसुली कर्मचारी दबाव असून सोडण्यास भाग पाडतात असे चित्र अनेकांच्या स्मरणात असेल.त्यावर त्या चालकावर दबाव आणल्यावर त्याला,”ट्रॅक्टर नांगरटीतून पळवून नेला” असे महसुली अधिकाऱ्यास बतावणी सांगण्यास सांगतात त्यात ‘ते’ तालुक्याच्या महसुली अधिकांऱ्यास कशी ‘शेंडी’लावायची याचा धडा देताना दिसत आहे.’तो’ चालक आपण महसुली अधिकाऱ्यांच्या तोफेच्या तोंडी जाण्यास तयार नसतो मात्र यांनी दबाव वाढविल्यावर व ‘तो’त्या वाळूचोरीचा लाल रंगाचा ‘स्वराज’ ट्रॅक्टर सोडून देतात असे एकंदरीत या ध्वनिफितीत चित्रित होत होत असताना त्या बाबत आता नवीन माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र ‘या’ महसुली कर्मचाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही हे विशेष ! आता त्यात वाळूचोर व कनिष्ठ महसूल कर्मचारी आता यांचे लागेबांधे आता हप्त्यापुरते मर्यादित राहिलेले नाही ‘ते’ आता भागीदारीपर्यंत पोहचले आहे.हि धक्कादायक पुढील प्रगती वाळूचोरीच्या इतिहासात प्रथमच उघड झाली आहे.त्यामुळे आता,’जसा राजा,तशी प्रजा’ हि जुनी म्हण प्रत्यक्षात येताना दिसत आहे.त्यामुळे याबाबत गोदावरी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी चक्क डोक्याला हात लावला आहे.व गोदा-गौतमीला आता भविष्यात केवळ ‘ब्रम्हदेव’च वाचवू शकेल असे वाटू लागले आहे.