गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या,उलटसुलट चर्चा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील तिनचारी येथील निवासी असलेल्या अल्पवयीन मुलीने घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी आज सकाळी ८.३० वाजेपुर्वी घडली असल्याची धक्कादायक बातमी उघड झाली असल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद मुलीच्या पित्याने केली आहे.
दरम्यान मयत अल्पवयीन मुलीने एक नाजूक प्रकरणावरून आत्महत्या केल्याची चर्चा आजूबाजूच्या ग्रामस्थांत होताना दिसून येत आहे.याबाबत पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.याला पोलिसी सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी शिवारातील तिनचारी येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह ती राहत असलेल्या घराशेजारच्या विहिरीत आज सकाळी महाराष्ट्र दिनीच सकाळी ८.३० वाजेच्या पूर्वीच आढळून आला आहे.
या तील खबर देणार मुलीचा पिता (वय-४२) यांचा साडू भाऊ (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या घराशेजारील विहिरीत सहज डोकावले असता त्यात मयत मुलगी पालथ्या अवस्थेत पाण्यात पडून तरंगताना मयत झाल्याचे दिसून आले.त्याबाबत त्यांनी ही खबर त्यांच्या नातेवाईकांना तातडीने कळवली असता त्यांनी तातडीने तिला वर काढले असता ती गायब मुलगी त्यांच्या साडू भावाची असल्याचे व ती मयत झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे.मुलींच्या पित्याने याबाबतची खबर कोपरगाव शहर पोलिसांना दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी याबाबत मुलीच्या पित्याच्या खबरी वरून अकस्मात मृत्यू र.नोंद क्रं. २१/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद आपल्या दप्तरी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोने हे करत आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या मृतदेहाचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून ते तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.नातेवाईकांनी तिच्यावर नुकतेच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे.