जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना तपासणी संचाची कमतरता होईना दूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात नगर येथे २०६ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १६ अँटीजन तपासणीत १४,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ३९ असे एकूण अहवालात एकूण ६९ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १४७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील एक पुरुष वय-५५ आदींचा समावेश आहे.कोरोना मृत्यूचे तांडव आता गल्ली बोळात आता गोंधळ घालु लागले असताना कोरोना तपासणीसाठी कोरोना तपासणी संच व आवश्यक साधने,लसी,खाटा,प्राणवायू आदींची मोठी कमतरता दिसून येत असून दुसरीकडे कोरोना लसीचा तुटवडा असल्याने त्या बाबत नागरिकांची हेळसांड होत आहे.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.त्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही बाधित नागरिकांना तपासणीसाठी आवश्यक साहित्याचा मोठा अभाव दिसून येत आहे.याबाबत आता शहरात नगरसेवकांनी पुढाकार घेऊन वर्गणी क करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आभाळच फाटल्यावर त्यांच्या ठिगळाला (प्रयत्नाला) मर्यादा येणार हि बाब उघड आहे.शहरात नगरपरिषदेला आता स्मशानभूमी कमी पडायला लागली असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्याची तयारी करावी लागत आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ७१ हजार ०८८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ४२७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ४८ हजार ६७९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ९८१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २८ दिवसात ७१ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.मात्र कोरोना तपासणीसाठी आवश्यक संच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची सर्व वाऱ्यावरील वरात असल्याचे दिसून येत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी कोविड लस हा एकमात्र पर्याय दिसत असल्याने त्याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेआत.मात्र मागणी आणि पुरवठा याबाबत मोठी तफावत असल्याने याचा ताळमेळ लावण्यास उशीर होणार हे उघड आहे.तो पर्यंत नागरिकांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close