गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात किराणा दुकानाची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील उजवा कालव्याच्या शेजारी असलेल्या “राहुल किराणा” या किराणा दुकानाची काही अज्ञात चोरट्यानी चोरी केली आहे.मध्यरात्रीच्या सुमारास पक्के बांधकाम असललेल्या या दुकानाच्या कालव्याचा मागील बाजूने भिंतीला बोगदा पाडून ७० ते ८० हजार रूपयाचा किराणा माल चोरट्यानीं लंपास केल्याने सुरेंगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे.तालुका प्रशासन या साथीचा प्रतिबंध करण्यास प्रयत्नशील असताना भुरट्या चोरांनी आपली ‘हाथ की सफाई’ दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत ‘राहुल किराणा’ दुकानाबाबत घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे.तालुका प्रशासन या साथीचा प्रतिबंध करण्यास प्रयत्नशील असताना भुरट्या चोरांनी आपली ‘हाथ की सफाई’ दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.सदर ठिकाणी “राहुल किराणा”नावाच्या दुकानात साखर,बेसनपीठ,काजू,बदाम,गुळ,खोबरे,शेंगदाणे,साबनी,सानिटायझर,तूर,डाळ,हरभरा,डाळ,आदी दुकानातील विविध वस्तूवर चोरट्यानी ताव मारला आहे.अशी राहुल किराणा लुटण्याची चोरट्यांनी पाचवी वेळ आहे हे विशेष ! या परिसरात सतत दुकाने फुटत असतात.यांचावर पोलिसानी चोरट्यांना धाक बसविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.असल्याची मागणी दुकानाचे मालक दिलीप आहेर यांनी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे व श्री गाडे यांचेकडे केली आहे.कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी स्वतः येऊन दुकानाची पाहणी केली आहे.अशा या उजव्या कालव्याच्या शेजारी दुकान नेहमी फुटत असतात पण पोलीसाकडून कुठलाही तपास लागत नाही कुठलीही कारवाई होत नाही अशी तक्रार सुरेगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. तेव्हा पोलीस खात्याने आता लवकर योग्य ती कारवाई करावी व या चोरट्यांचा बंदोबस्त करावा शि मागणी सुरेगाव व्यापाऱ्यांनी केली आहे.