गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या कृष्णा मोगल आहिरे (वय-३१) यांच्या मालकीची सुमारे वीस हजार रुपये किमतीची ‘हिरो’ कंपनीची ‘पॅशन’ हि दुचाकी आरोपी वसीम (पूर्ण नाव माहित नाही) रा.चंदनवाडी ता.नांदगाव जिल्हा नाशिक याने दि.२४ एप्रिल रोजी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग चासनळी येथून चोरून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे चासनळी परिसरातील दुचाकीस्वारात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी कृष्णा आहिरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव तालुका पोलीसांनी या प्रकरणी आरोपी वसीम याचे विरुद्ध गु.र.क्रं.१२१/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशीद हे करीत आहेत.